मोदी सरकारविरुद्ध रोष; घोडेसवारी करत वेधले सरकारचे लक्ष
अमरावती : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिंलिडरच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. मोदी सरकारच्या जनहितविरोधी धोरणामुळेच महागाई वाढत चालल्याचा आरोप युवक काँग्रसने केला आहे. या वाढत्या महागाईविरुद्ध सोमवारी राजकमल चौक येथून युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी घोडेसवारी व सायलक रॅलीव्दारे महापालिक प्रवेशव्दारासमोर तसेच मालविय आणि इर्विन चौकातील पेट्रोल पंपासमारे मोदी सरकारविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करीत इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्रातील मोदी सकारच्या विरोधात घोषणाबाजी करणारे पोस्टर परिधान करून शहरवासीयांचे लक्ष वेधले. याशिवाय रिकामे गॅस सिंलिडर डोक्यावर घेऊन वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्लिल झाले असून ही महागाई तात्काळ कमी करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसचे महासचिव सागर देशमुख, जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, सागर कलाने, गुडू हमीद, आशिष यादव, मुकेश लालवाणी, श्रवण लकडे, रवी रायबोले, प्रथमेश गवई, तन्मय मोहोड आदींनी दिला आहे.