शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या तरुणाला पनवेलमध्ये अटक, अमरावती पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:45 IST

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविणा-या तरुणाला पनवेल पोलिसांनी पकडले. गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला पनवेलहून ताब्यात घेतले असून त्याला मंगळवारी अमरावतीत आणले. रोशन निरंजन चराटे (२२,रा.विलासनगर) असे आरोपीचे नाव आहे. 

अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविणा-या तरुणाला पनवेल पोलिसांनी पकडले. गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला पनवेलहून ताब्यात घेतले असून त्याला मंगळवारी अमरावतीत आणले. रोशन निरंजन चराटे (२२,रा.विलासनगर) असे आरोपीचे नाव आहे.      मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. विलासनगरातीलच रोशन चराटेवर मुलीच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. प्रेमप्रकरणातून आरोपीने मुलीला पळवून नेल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. आरोपीच्या मोबाईल क्रमाकांच्या आधारे पोलिसांनी लोकेशन घेतले असता तो तरुण सर्वप्रथम नागपूरला असल्याचे आढळून आले. त्यानंतर ते भुसावळ रेल्वे स्टेशनवर असल्याचे समजले. त्यानुसार अमरावती पोलिसांनी भुसावळ पोलिसांची मदत घेतली. मात्र, शोध घेण्यापूर्वीच ते तेथून निघून गेले. दोघेही मुंबईतील पनवेल स्टेशनवर चार तास बसून होते. ही बाब पनवेल पोलिसांना माहिती होताच तेथील पोलीस निरीक्षक विश्वकार व पोलीस उपनिरीक्षक बाबर यांनी आरोपीसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक पनवेलला रवाना झाले आणि दोघांनाही ताब्यात घेतले.

टॅग्स :Arrestअटक