शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केळी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडून तरुणीचा मृत्यू; अमरावती जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 06:00 IST

अमरावती जिल्ह्यात केळी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडकीस आले.

ठळक मुद्देवाशीम येथील घटनाअमरावतीत शवविच्छेदन, भावालाही मळमळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केळी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडकीस आले. कांचन जगन्नाथ अघम (२१, रा. मोहगव्हाण-झोडगा, ता. कारंजा लाड, जि. वाशीम) असे मृताचे नाव आहे. केळीचा अंश घशात अडकून तिचा मृत्यू झाला असावा किंवा फूड पॉयझन झाले असावे, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.मोहगव्हाण येथील अघम कुटुंबीयांनी बाजारातून केळी घरी आणली होती. कांचन अघम, तिचा भाऊ व आई-वडील अशा चौघांनीही शुक्रवारी सकाळी केळी खाल्ली. कांचन हिने अर्धेच केळ खाल्ले. त्यानंतर १५ मिनिटांनी तिला अस्वस्थ वाटू लागले. मळमळ होऊ लागली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला तात्काळ कारंजा लाड येथील खासगी डॉक्टरकडे नेले. तेथून तिला तेथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आला. मात्र, प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून कांचनला अमरावती येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. तेथून तिला दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. डॉक्टरांनी तपासणीनंतर कांचनला मृत घोषित केले. या घटनेबद्दल मृताच्या नातेवाइकांना माहिती विचारली असता, कांचनने केळ खाल्यानंतरच तिची प्रकृती बिघडल्याचे सांगितले.अर्ध्या तासाने भावालाही मळमळकांचनसोबत तिचा भाऊ अभिषेक यानेही सकाळी केळी खाल्ली होती. प्रथम कांचनची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. यादरम्यान अभिषेकलाही मळमळ होऊ लागली. त्यालाही कारंजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.केळी खातानाच बोलल्यास ते घश्यात अडकण्याची शक्यता असते. कांचन अघमच्या घशात केळ अडकून तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. मात्र, शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचे निश्चित कारण कळू शकेल.- एस. आय. थोरात, कॅज्युअल्टी वैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय.

टॅग्स :Deathमृत्यू