लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : लागवणीने दिलेल्या शेतातील ठरल्याप्रमाणे हिस्सा न देणाऱ्या इसमास एकाच कुुटुंबातील सात सदस्यांनी झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना नजीकच्या जवर्डी शेकापूर येथे गुरुवारी सकाळी ७.३० वाजता घडली. जखमी मंगेश काळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.मुन्ना गुल्लू गाठे, विष्णू मुन्ना गाठे, देवानंद मुन्ना गाठे, मुकेश गाठे, रघुनाथ गाठे, अजय गाठे, मनीष गाठे (रा. जवर्डी शेकापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी मंगेश काळे यांना लागवणीसाठी शेत दिले होते. दरवर्षी ठरल्याप्रमाणे शेतात आलेल्या उत्पादनाचा काही हिस्सा हा गाठे कुटुंबीयांना द्यायचे करारात ठरले होते. मात्र, कराराप्रमाणे तू आमच्याशी वागत नाही व उत्पादन जास्त झाले असल्याने आम्हालासुद्धा त्यातील हिस्सा दे, अशी मागणी आरोपींकडून होत होती.हाच वाद हळूहळू विकोपाला जाऊन गुरुवारी सकाळी ७.३० वाजता आरोपींनी मंगेश काळे याला झाडाला बांधून मारहाण करण्यास सुरुवात केली. ही माहिती कळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व झाडाला बांधून असणाºया मंगेश काळे यांना सोडविले.फिर्यादीच्या जबानी तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम १४३, १४७, ३२३, ३३९, ३४२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केली. सातपैकी दोन आरोपींना परतवाडा पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपी अद्यापही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
युवकाला झाडाला बांधून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:21 IST
लागवणीने दिलेल्या शेतातील ठरल्याप्रमाणे हिस्सा न देणाऱ्या इसमास एकाच कुुटुंबातील सात सदस्यांनी झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना नजीकच्या जवर्डी शेकापूर येथे गुरुवारी सकाळी ७.३० वाजता घडली.
युवकाला झाडाला बांधून मारहाण
ठळक मुद्देजवर्डी येथील घटना : सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल