शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

धारखोराच्या डोहात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:29 IST

अमरावती नजीकच्या सुकळी येथून पंधरा ते सोळा मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाला गेलेल्या युवकाचा मध्य प्रदेशच्या धारखोरा येथील डोहात बुडून मृत्यू झाला. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास सदर घटना घडली.

ठळक मुद्देमृत सुकळीचा : मित्रांसह सहलीला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अमरावती नजीकच्या सुकळी येथून पंधरा ते सोळा मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाला गेलेल्या युवकाचा मध्य प्रदेशच्या धारखोरा येथील डोहात बुडून मृत्यू झाला. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास सदर घटना घडली.शुभम सुधाकर गजबे (२३, रा. सुकळी, ता.जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. तो त्याच्या गावातील पंधरा ते सोळा युवकांसोबत मेळघाट जंगलाला लागून मध्य प्रदेशच्या भैसदेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धारखोरा येथील प्रेक्षणीय धबधब्यावर पर्यटनासाठी गेला होता. सर्व मित्रांची हुल्लडबाजी सुरू असताना शुभमचा डोहात बुडून मृत्यू झाला.सदर घटना जंगलात घडल्यामुळे काही मित्रांनी लागोलाग परतवाडा येथे येऊन सामाजिक कार्यकर्ते किशोर कासार, भूषण फिसके, सौरभ इंगोले, सागर चांदणे, तिरंगा जाधव, उमेश हरदे यांना सदर प्रकार सांगितला. संबंधितांनी रुग्णवाहिका घटनास्थळी नेऊन डोहात त्याचा मृतदेह शोधून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणला. शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन आचोपल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला.शुभमच्या मृत्यूप्रकरणी भैसदेही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. उपविभाग असल्याने अचलपूर पोलीस ठाण्यानेही या प्रकरणाची नोंद घेतली आहे.दरम्यान, पर्यटनाला जाताना हुल्लडबाजीमुळे पर्यटकांना वा वाहनाला अपघात व त्यातून जीव गमवावा लागत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.सैन्यात झाली निवडमृत शुभम गजबेची निवड सैन्यात झाली होती. वैद्यकीय तपासणी तेवढी बाकी असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Deathमृत्यू