शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

युवा साहित्यिकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:04 IST

येथील जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयात उभारलेल्या स्व. बाळासाहेब तेलखेडे साहित्य नगरीत दुसरे युवा साहित्य संमेलन शुक्रवारी कला व साहित्य विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

ठळक मुद्देमराठी साहित्य संमेलन : भारत गणेशपुरे, किशोर बळींची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतदर्यापूर : येथील जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयात उभारलेल्या स्व. बाळासाहेब तेलखेडे साहित्य नगरीत दुसरे युवा साहित्य संमेलन शुक्रवारी कला व साहित्य विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. नव्या उमेदीच्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे या हेतून साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.संत गाडगेबाबा मंडळ दर्यापूर आणि अकोला येथील सृष्टी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा साहित्यिक किशोर बळी होते. उद्घाटन प्रसिद्ध हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले. यावेळी गझलनवाज भीमराव पांचाळे, शास्त्रीय युवा गायिका भाग्यश्री पांचाळे, व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख, प्राचार्य रामेश्वर भिसे, संतोष हुशे, पप्पू मोरवाल, ईश्वर मते, पंकज कांबळे, अभिजित नागले, दीपाली बळी, वनिता गावंडे, मनोहर घुगे उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशवराव गावंडे यांनी जबाबदारी सांभाळली. संचालन अरविंद शिंगाडे, दीपिका सोनार, अक्षय राऊत, तर आभार गोपाल मापारी यांनी मानले. यावेळी स्व. केतन पिंपळापुरे प्रवेशद्वार आणि स्व. हिंमत शेकोकार ग्रंथदालन तसेच स्व. त्र्यंबकराव गणेशपुरे सभामंडप उभारून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी प्राची मेंढे, दीप्ती वानखडे, विश्वजित गुडधे, अश्विनी कोल्हे, सागर देशमुख, चंद्रशेखर तरारे, यशश्री काशीकर, नीळकंठ महल्ल, युवराज ठाकरे, राघवेंद्र गणेशपुरे व शुभांगी माहुरे या प्रतिभावंत युवा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दीपिका सोनार यांची चित्रप्रदर्शनी, गोपाल खाडे यांची गणेशचित्रप्रदर्शनी हे संमेलनाचे आकर्षण ठरले. श्रोत्यांची गर्दी उसळली होती.