शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे चुकारे आठ दिवसात मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:21 IST

गतवर्षी नाफेडद्वारा खरेदी करण्यात आलेल्या १,६०० शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे आठ दिवसांत तर खरेदी विक्री संघाचे प्रलंबित असलेले कमिशन व खर्चाचा निधी दोन आठवड्यांत मिळणार असल्याचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : पणन विभागाच्या प्रधान सचिवांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी नाफेडद्वारा खरेदी करण्यात आलेल्या १,६०० शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे आठ दिवसांत तर खरेदी विक्री संघाचे प्रलंबित असलेले कमिशन व खर्चाचा निधी दोन आठवड्यांत मिळणार असल्याचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी याविषयीचे आश्वासन दिले.किरकोळ कारणांवरून जिल्ह्यातील सात खरेदीविक्री संघाना काळ्या यादीत टाकण्यात आलेले आहे. या सर्व केंद्रावर आॅनलाइन नोंदणी व खरेदीला अडचणी येत असल्याने शेतकरी संकटात आला आहे. या संस्थांची निष्पक्ष चौकशी करून संस्थांना काळ्या यादीतून बाहेर काढण्याची मागणी यावेळी आ. जगताप यांनी पणन विभागाचे प्रधान सचिव अनूपकुमार यांचेकडे केली. शासनाने योजना जाहीर केली तेव्हा अडचणीच्या काळात या खरेदी विक्री संघाने मदत केल्याने होणाऱ्या चौकशीच्या अधीन राहून या संस्थांना पुन्हा खरेदीचे काम द्यावे, अशी मागणी आ. जगताप यांनी केली. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, धामणगाव व नांदगाव खंडेश्वर या खरेदी-विक्री संघांचे कमिशन व खर्चाचा निधी अद्याप प्रलंबित आहे. यामध्ये धामणगाव खरेदी विक्री संघाचे ६० लाख, चांदूर रेल्वे ३० लाख व नांदगाव खंडेश्वर येथील अंदाजे ३० लाख रूपयांचे कमिशन व खर्चाची रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी आ. जगताप यांनी केली असता दोन आठवड्यात हा निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही अनूपकुमार यांनी दिली.वाघाची दहशत, रात्रीचे भारनियमन नकोमंगरूळ दस्तगीर परिसरात शुक्रवारी एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यामुळे धामणगाव व चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये दहशत आहे. मात्र, महावितरणद्वारा दिवसांचे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचे सिंचनासाठी जावे लागत असल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे या परिसरात रात्रीचे भारनियमन करावे, अशी मागणी आ. जगताप यांनी विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांच्याकडे केली.

टॅग्स :Virendra Jagtapविरेंद्र जगताप