शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भंगार वाहनांतून करावा लागतो प्रवास, सांगू कोणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात.

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या वाहनांना १० ते १५ वर्षे पूर्ण झाले. त्यानंतर आरटीओकडून वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन नोंदणी करणे अनिवार्य असते. मात्र, आता नोंदणी नसलेल्या अनेक वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे दुर्दैवाने अपघात झालाच, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंगार वाहनांतून जीवघेणा प्रवास सुरू असला तरी सांगू कुणाला, असा सवाल प्रवाशांचा आहे.आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात. तरीही प्रवासी वाहने विनाफिटनेस, विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओने अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहेत. एसटीचा पूर्णपणे संप अद्यापही मिटला नाही.  त्यामुळे नागरिकांची गोची होत असून, खासगी प्रवासी वाहनांशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. स्थानिक मध्यवर्ती आगार परिसरातून तसेच पंचवटी चाैकातून खासगी प्रवासी वाहने सुसाट धावतात. यात अनेक भंगार वाहनांचाही समावेश असतो. अशा वाहनांवर नियमाने कारवाई व्हायला हवी. 

या वाहनांशिवाय पर्याय नाहीबस बंद असल्यामुळे नागपूरला जायचे असल्यास लक्झरी बस तसेच परतवाडा, दर्यापूर, चांदूररेल्वे, मोर्शी व इतर तालुक्यात जाण्यासाठी काळी पिवळी, स्कूल बस तसेच इतर अनेक खासगी वाहने धावत आहेत. प्रवासी अधिक असल्याने भंगार वाहनेही रस्त्यावर काढली आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी नाही, अशा नागरिकांना खासगी प्रवासी वाहनाशिवाय पर्याय नाही.

दीडपट भाडे देऊनही जिवाला धोकाएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सर्व खासगी वाहने रस्त्यावर उतरली असून प्रवासी भाडे घेत आहे. बस बंद असल्याचा फायदा घेत भाडे दीडपट ते दुप्पट केले आहे. असे असतानाही अनेक भंगार अवस्थेत असलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले. वाहनाचे आयुष्य संपल्यानंतरही आरटीकडे नोंदणी नूतनीकरण न करता वाहने धावत असल्याने कारवाईची अपेक्षा आहे.

नियमानुसर ज्या प्रवासी वाहनांचे आयुष्य ८ वर्षापेक्षा जास्त झाले आहे. अश्या वाहनांना दरवर्षी फिटनेस करून पासिंग करुन घ्यावी लागते. विना पुर्ननोंदणी न करता वाहने धावत असतील तर अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. तशी वर्षभरही कारवाई करण्यासंदर्भातील मोहिम सुरुच असते. मोटर वाहन चालकांना आदेशित करून पुन्हा मोहिम राबविण्यात येईल.-रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस