शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तू माहेरी जा, तुझ्यासारख्या दहा बायका आणतो, विवाहितेचा छळ

By प्रदीप भाकरे | Updated: August 17, 2023 13:33 IST

धमकी देत विवाहितेला घराबाहेर काढले

अमरावती : तू माहेरी निघून जा, तुझ्यासारख्या दहा बायका मी आणतो, अशी धमकी देत एका विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. १४ मे २०२२ ते ७ फेब्रुवारीदरम्यान काैटुंबिक छळाची ती मालिका घडली. याप्रकरणी २४ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी आरोपी विजय निहारे (३६), विठ्ठल निहारे व एक महिला (सर्व रा. वर्धा) यांच्याविरूध्द कौटुंबिक छळ व हुंडाबंदी अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल केला.

आरोपी विजय हा मद्यपी असून, तो दारूच्या नशेत पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी आरोपी व सासूसासऱ्यांनी तिला माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगाला लावला. पैसे आण अन्यथा तू माहेरी निघून जा, तुझ्यासारख्या मी दहा बायका आणतो तू लवकर माहेरी निघून जा, असे म्हणून तिला मारहाण केली. यापुढे घरात दिसली तर मुडदा पडेल, अशी धमकी देत रात्री आठच्या सुमारास तिला घराबाहेर काढले. विवाहिता तेव्हाच माहेरी निघून आली.

ती माहेरी परतल्यानंतर आरोपी विजय हा तिला फोनवर शिवीगाळ करायचा. ७ फेब्रुवारी रोजी तो दारू पिऊन तिच्या माहेरी आला. त्यावेळी ती एकटीच घरी होती. तो तिच्या अंगावर मारायला धावला. त्यामुळे ती तिच्या मोठ्या आईच्या घरात जाऊन दडली. त्यावेळी शिव्या देत तो तेथून निघून गेला. त्यानंतरही त्याच्याकडून छळ सुरूच राहिला, त्यामुळे अखेर तिने पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारAmravatiअमरावती