शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही करा राजकारण, आम्ही करतो रामचंद्राच्या नावाने समाजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 05:00 IST

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे अभिषेक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, वस्त्रदान व अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे  यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशात सध्या रामाच्या नावाने राजकारण सुरू असताना, मात्र रामाच्या नावाने सुरू असलेली आमची संस्था समाजोपयोगी काम करीत आहे. माझ्या आजोबांचे नाव रामचंद्र आणि वडिलांचे नाव चंद्रकांत असून वडिलांनी ही आजोबांच्या नावाने संस्था सुरू केली. याच संस्थेच्या माध्यमातून पुष्पमाला अभियान करण्याची घोषणा मंगळवारी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली. वाढदिवसाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.मनपा शाळेच्या विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी आर्थिक दुर्बल कुटुंबातील ज्या मुलीला सायकल पाहिजे त्यांच्यासाठी पुष्पमाला अभियानातून सायकल उपलब्ध केली जाईल. आमच्या श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्यावतीने पुष्पमाला अभियान राबविले जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘माणूस मोठा नसतो, पद मोठे असते आणि त्याहीपेक्षा काम गोड असते’ आणि “कार्यकर्त्यांसोबत राहिले पाहिजे” ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची शिकवण असल्याचे त्या म्हणाल्या.माजी महापौर विलास इंगोले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, बबलू शेखावत, अनिल अग्रवाल, बंडू हिवसे, धीरज हिवसे, सुनीता भेले, माजी नगरसेवक अहमद खान, सुरेश रतावा, राजू भेले, गजानन राजगुरे, प्रमोद इंगोले आदी उपस्थित होते. त्यांची गूळतुला करून तेवढा गूळ गौरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आला.  याप्रसंगी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त पजाय या लघुपटातील कलाकार रितेश हातागडे, नीकेश सोनटक्के, निर्माता सौरभ बोरडे तसेच विद्यापीठ युवा महोत्सव बासरी वादक रोहन खंडारे यांचा सत्कार करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त मुंबईत अभिषेक महाआरती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे अभिषेक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, वस्त्रदान व अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे  यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर