शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’चा अटॅक

By admin | Updated: August 13, 2015 00:56 IST

खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात ३ लाख २० हजार ५४६ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे.

जिवाणूजन्य रोगांचाही प्रादुर्भाव : कीडरोग व्यवस्थापन महत्त्वाचेअमरावती : खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात ३ लाख २० हजार ५४६ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. १० दिवसांपासून सतत पाऊस असल्यामुळे सोयाबीनवर कीडींचा तसेच जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगट बियाण्यांच्या वापरामुळे यावर्षी देखील ‘पिवळा मोझॅक’ या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची पेरणी महिनाभर माघारली होती. पाऊस खोळंबल्याने सोयाबीन बियांची उगवण देखील कमी झाली. याचा थेट परिणााम उत्पन्नावर होणार आहे. अशा स्थितीत हिरवी अळी, पानावर ठिबक्यांचा जिवाणूजन्य रोग व रोगट बियाण्यांमुळे उद्भवणारा विषाणूजन्य ‘मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव सध्या सोयाबीनवर झाला आहे. हे विषाणूजन्य रोेग ईतर रोगांपेक्षा जास्त हानीकारक असल्याने ५० ते ९० टक्क्यांपर्यंत सोयाबीनच्या उत्पन्नात घट होते.सध्याच्या आर्द्रतेच्या वातावरणात झाडाच्या पानावर त्रिकोणी व चौकोनी आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येत आहेत. हा विषाणूजन्य रोग आहे. शेतकऱ्यांनी रोग व कीडींच्या बंदोबस्तासाठी कृषी विभागाच्या कृषीतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पीक व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. अशी करावी उपाययोजनाया रोगाची लक्षणे असलेली झाडे दिसून येताच त्वरीत उपटून जाळावी, तणाचा बंदोबस्त करावा. मावा व पांढरी माशी या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायझोफॉस ४० टक्के २५ मिली किंवा अ‍ॅसीफेट ७५ टक्के २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे किटकशास्त्रज्ञ राजेंद्र जाणे यांनी सांगितले. जिल्ह्यात ३ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनजिल्ह्यात ३ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे पीक आहे. यामध्ये धारणी १६,९१०, चिखलदरा १४,२९८, अमरावती ३५,२१०, भातकुली ३२,८२५, नांदगाव ४८,२११, चांदूर रेल्वे २६,७६३, तिवसा २३,७०९, मोेर्शी २१,४५६, वरुड २५००, दर्यापूर २७,३१९, अंजनगाव १७,७०७, अचलपूर १६०१२, चांदूर बाजार २२,११८, व धामणगाव तालुक्यात २५,२५६, हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र आहे. पिवळ्या मोझॅकची लक्षणेयामध्ये रोगट रोपांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पानातील हरितद्रव्ये नाहीशी झाल्याने अन्ननिर्मितीमध्ये बाधा उत्पन्न होऊन उत्पादनात घट येते. सोयाबीन मोझॅकमध्ये झाडांची वाढ खुंटते. पाने लहान, आखुड, जाडसर व सुरकुतलेली होतात. असा होतो रोगाचा प्रसारहा रोग मुंगबीन येलो मोझॅक विषाणुमुळे होतो. विषाणुची वाहक पांढरी माशी आहे. उबदार तापमान, वाहक पांढऱ्या माशींची अधिक संख्या, अतिदाट पेरणी नत्राचा अधिक वापर रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरतो.जिवाणूजन्य रोगामुळे पानावर ठिपकेआर्द्र हवामानात हा रोग वाढत आहे. झाडांच्या पानावर त्रिकोेणी, चौकोनी आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येत आहेत. रोगग्रस्त बियाणे, झाडांच्या रोगट अवशेषामुळे रोगाचा प्रसार होतो. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी रोगाचा प्रार्दूभाव दिसून येतो. काही दिवसांनी पानावर काळी सुक्ष्म बुरशी दिसून येते.