शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

जंगलात बहरला पिवळा पळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:17 IST

जिल्ह्यातील जंगलात पिवळा पळस बहरल्याने वनविभागासह निसर्गप्रेमींमध्ये आनंद संचारला आहे. आयुर्वेदिक औषधीयुक्त असलेला पळस अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडल्यामुळे लोप पावत आहे.

ठळक मुद्देआयुर्वेदिक औषधीयुक्त वृक्ष : होळीच्या नैसर्गिक रंगाची आठवण ताजी

वैभव बाबरेकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील जंगलात पिवळा पळस बहरल्याने वनविभागासह निसर्गप्रेमींमध्ये आनंद संचारला आहे. आयुर्वेदिक औषधीयुक्त असलेला पळस अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडल्यामुळे लोप पावत आहे.वनविभागाचे वनरक्षक अमोल गावनेर यांना जंगलात पिवळ्या फुलाचे पळसवृक्ष बहरलेले आढळले. यापूर्वी सन २०१३ मध्ये पिवळ्या फुलाच्या पळसाची वर्धा जिल्ह्यात नोंद झाल्याची माहिती वन्यप्रेंमी देत आहे. रंगपंचमीच्या पर्वावर नैसर्गिक रंग म्हणून पळसांच्या फुलांचा उपयोग होतो. जंगलात बहुंताश पळसाच्या वृक्ष लाल रंगाच्या फुलांनी बहरले असून जंगलात एकच पिवळ्या रंगाचे हे एकमेव पळस वृक्ष आकर्षण ठरत आहे. पळसांची लाल रंगाची फुले सर्वाधिक आढळतात. यात पिवळा, पांढरा, लाल, केसरी फुलांचे पळसाचे वृक्ष आहेत. अल्बिनिझमचा प्रकार असून यामध्ये वनस्पतीतील रंगद्रव्यात बदल होतो. पांढºया व पिवळ्या रंगांच्या पळसांच्या फुल धनप्राप्ती होते ही अंधश्रद्धा आहे. या झाडाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे एक आयुर्वेदिक औषध आहे. हे वृक्ष जगंलात असल्याने त्याला वन विभागाचे सरंक्षण मिळाले आहे.नैसर्गिक रंगाने होळी साजरी कराहोळीपूर्वी पळस वृक्ष फुलांनी बहरतात. पूर्वी याच नैसर्गिक रंगाने रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र आता कृत्रिम रंगांच्या वापर वाढल्याने त्वचेचे विकार वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक रंगानेच रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन वन्यजीवप्रेमी नीलेश कंचनपुरे यांनी केले आहे.पिवळ्या रंगाची फुले असणारे पळसाचे वृक्ष वनरक्षकांना आढळले आहे. वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे त्या वृक्षाला जंगलात सरंक्षण देण्यात आले आहे.- प्रवीण चव्हाण,मुख्य वनसरंक्षक (प्रादेशिक)