शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची पाणीटंचाई @ १९३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:54 IST

राज्यात यंदा उद्भवलेल्या पाणीटंचाईवर सरकारी तिजोरीतून तब्बल १९३ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

ठळक मुद्देसर्वाधिक झळ औरंगाबाद विभागाला नऊ उपाययोजनांचा समावेश

प्रदीप भाकरे।आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यात यंदा उद्भवलेल्या पाणीटंचाईवर सरकारी तिजोरीतून तब्बल १९३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सन २०१६-१७ च्या टंचाई कालावधीसाठी ग्रामीण तसेच नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने १९३.२१ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली. त्यातून यंदाच्या पाणीटंचाईने सरकारी तिजोरीवर मोठा भार पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.सन २०१६-१७ या टंचाई कालावधीत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांकरिता तसेच या कालावधीतील प्रलंबित देयकांवर हा निधी खर्च करण्यात यावा, असे निर्देश सहा महसूल विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.राज्याच्या नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोकण व पुणे या सहा महसुली विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांतील ग्रामीण तथा नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ अनेक योजना राबविण्यात आल्यात. यात नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर तथा बैलगाडीने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोल करणे, गाळ काढणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश होता. सहाही महसुली विभागातील ग्रामीण व नागरी भागात सन २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या व येणाऱ्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी हा १९३.२९ कोटींचा निधी विभागीय आयुक्तांकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. यात कोकण विभागाला ५.६५ कोटी, नाशिक विभागाला २१.२७ कोटी, पुणे विभागाला ३६.८२ कोटी, औरंगाबाद विभागाला ४३.५९ कोटी, अमरावती विभागाला ४३.५३ कोटी, तर नागपूर विभागाला ४२.३९ कोटी रूपये प्राप्त होणार आहेत. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजनानिहाय निधीचे वितरण करावे, अशी सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० आॅक्टोबरला घेतलेल्या निर्णयानुसार दिली आहे.

टॅग्स :Waterपाणी