शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पश्चिम विदर्भात यंदा ३२ लाख हेक्टरमध्ये खरीपाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:37 IST

यंदा सरासरी इतका पाऊस राहणार असल्याचे भाकित ‘आयएमडी’ द्वारा वर्तविण्यात आले, त्यामुळे खरीप हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाद्वारा अमरावती विभागात यंदा ३२ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

ठळक मुद्देसहा लाख क्विंटल बियाण्यांची गरजकृषी विभागाद्वारा प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा सरासरी इतका पाऊस राहणार असल्याचे भाकित ‘आयएमडी’ द्वारा वर्तविण्यात आले, त्यामुळे खरीप हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाद्वारा अमरावती विभागात यंदा ३२ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यानुसार किमान ५.८० लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. याव्यतिरिक्त २३,३०० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे.अमरावती जिल्ह्यात सात लाख २६ हजार हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात सात लाख १४ हजार, वाशिम जिल्ह्यात चार लाख सहा हजार व यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नऊ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे. यासाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्रातून एकूण ५ लाख ८० हजार ४५६ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १,५५,५३८ क्विंटल, अकोला जिल्ह्यात ८६,२९०, वाशिम जिल्ह्यात एक लाख, अमरावती १,२१,९७० व यवतमाळ जिल्ह्यात १,१५,६१२ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये २ लाख ५५ हजार ६७६ क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ३१,६८०, अकोला जिल्ह्यात ३५,८६८, वाशिम ५१,७२६, अमरावती ६६,३९० व यवतमाळ जिल्ह्यात ७०,०१२ क्विंटल बियाणे उपलब्ध करणार आहे.बीटीच्या ४६.५० लाख पाकिटांची मागणीयंदाच्या खरिपात ४६ लाख ५० हजार बीटी बियाण्यांची पाकिटे लागणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ८,११,५००, अकोला ६,०५,००० वाशिम १,२६,०००, अमरावती ९३,७,५०० व यवतमाळ जिल्ह्यात २१,७०,००० पाकीटे लागणार आहे. ही सर्व बीजी-२ ची आहेत तर बीजी-१ ची ८,१२३ पाकिटांची मागणी आहे. मागील वर्षी १०,२६,२७१ हेक्टर पेरणी होते त्यातुलनेत यंदा ९,३२,५०० हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे.यंदा ६.६४ लाख मे.टन खतांची मागणीयंदाच्या खरिपासाठी ६,६४,७८५ मे.टन रासायनिक खतांची मागणी आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात २,०७,९७३ मे.टन, अकोला १०,७,०००, वाशिम ४४,०००, अमरावती १,४०,००० व यवतमाळ जिल्ह्यात १,६५,८१२ मे.टन खतांचा ामावेश आहे. सर्वाधिक युरीया २,१४,९०९ मे.टन, डीएपी १,१०,६८०, एमओपी ३८,४५३ व एसएसपी ८९,०९५ मे.टन खतांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती