शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत पंचायतराज अभियानात अमरावती जि. प. विभागात अव्वल

By जितेंद्र दखने | Updated: April 2, 2025 20:55 IST

निकाल घोषित : तिवसा,अंजनगाव सुर्जी पंचायत समितीची दमदार कामगिरी

- जितेंद्र दखने

अमरावती : प्रशासकीय व्यवस्थापन व विकासकार्यात उत्तम काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार योजनेंतर्गत २०२४-२५ चा विभागीय स्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अमरावती जिल्हा परिषद विभागात प्रथम आली असून, याशिवाय जिल्ह्यातील तिवसा व अंजनगाव सुर्जी या दोन पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविला आहे, तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समिती विभागात तृतीय आली आहे.

विशेष म्हणजे सन २०२३-२४ मध्येही अमरावती जिल्हा परिषद विभागात प्रथम आलेली आहे. राज्यामधील विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्थांमार्फत राबविल्या जातात. यासाठी राज्यात पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसाठी विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान ही पुरस्कार योजना सुरू केली आहे. ग्रामीण विकास क्षेत्रात यशवंत पंचायतराज हा सर्वसमावेशक पुरस्कार असल्याने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. शाश्वत विकास ध्येयांचे निकष व राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांतर्गत अमरावती जिल्हा परिषद व तिवसा, अंजनगाव सुर्जी पंचायत समित्यांनी केलेली प्रगती विचारात घेऊन यशवंत पंचायतराज अभियान सन २०२४-२५ (मूल्यमापन वर्ष २०२३-२४) राबविण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समिती यांनी सहभाग घेतला होता. विभागातून प्रथम क्रमांकावर आल्यामुळे राज्यस्तरावरून होणाऱ्या मूल्यमापन स्पर्धेकरिता जिल्हा परिषद व तिवसा, अंजनगाव व शेगाव पंचायत समिती पात्र झाली.सलग दुसऱ्यांदा बाजी या अभिनव उपक्रमामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेने विविध विभागामार्फत वर्षभर राबविलेल्या शासनाच्या योजनांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले. विभागस्तरीय समितीने जिल्हा परिषदेला काही महिन्यांपूर्वीच भेट देऊन जिल्हा परिषदेने केलेल्या मूल्यमापन प्रतवारी अहवालाची तपासणी केली. विभागस्तरीय समितीने केलेल्या तपासणीमध्ये अमरावती जिल्हा परिषदेने सलग दुसऱ्यांदा विभागातून प्रथम क्रमांक  पटकाविल्याची माहिती सीईओ संजीता महापात्र यांनी दिली.