शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात ऊन-सावल्यांची पाठशिवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:03 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे.

ठळक मुद्देबोडके झाले रान : पर्यटकही पडले मोहात

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे. त्यातही दिवसभर ऊन-सावल्यांचा पाठशिवणीचा सुरू असलेला खेळ पर्यटकांना मोहिनी घालणारा ठरला आहे.राज्यातील एक अग्रगण्य थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा पर्यटनस्थळाचा नावलौकिक आहे. समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेल्या या पर्यटनस्थळावर हजारो पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. येथील विविध ऐतिहासिक व महाभारतकालीन वास्तूंचा जतन केलेला ठेवा, मनोवेधक पॉइंट, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणारे धबधबे, गगनचुंबी हिरव्या डोंगररांगा, दाट धुके अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांनी चिखलदरा समृद्ध आहे. उन्हाळा लागताच मोठ्या प्रमाणात पानगळ झाल्याने हिरवेगार असलेले मेळघाट जंगल व विविध पॉइंट आता वाळवंटासम झाले आहेत. डोंगर-दऱ्यासुद्धा उघड्या पडल्या आहेत. पानगळ झाल्याने झाडांचे सांगाडे तेवढे उभे आहेत.घाटवळण अन् उंच पहाडचिखलदरा पर्यटनस्थळावर येणाºया पर्यटकांना ऊन-सावल्यांचा खेळ मोहात पाडून जातो. घाटवळणाच्या उंच पहाडावर पर्यटकांची वाहने थांबण्याची काही ठिकाणे आहेत. तेथे पर्यटक थांबून तेथून सावल्यांच्या खेळाचा मनोवेधक नजारा पाहतात. सावलीच्या मागे ऊन धावत असल्याचे हे चित्र लक्षवेधी ठरले आहे. संपूर्ण उन्हाळाभर मेळघाटच्या घनदाट जंगल वाळवंटाप्रमाणे भासत असले तरी मान्सूनच्या पहिल्या सरी कोसळताच सांगाडे दिसत असलेल्या झाडांवर नवीन पालवी फुटते; हिरवेगार घनदाट जंगल डोळ्यांचे पारणे फेडते, हे विशेष.कमी पाऊस, वृक्षतोड आणि वणवामेळघाटात दरवर्षी पावसाची नोंद कमी-कमी होत असल्याचे गंभीर चित्र आहे. दुसरीकडे जंगलात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड आणि मानवनिर्मित आगी संतापजनक आहे. जंगलात वृक्षतोड करून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण व शेतजमीन तयार करणे तसेच तेंदुपत्ता, मोहफुले, बारशिंगे उचलता यावी आणि गुरांसाठी चारा मोठ्या प्रमाणात निघावा, या आणि इतर कारणांसाठी जंगलात आगी लावण्यात येत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. वनविभाग आणि आदिवासींचा या मुद्द्यावर अनेकदा संघर्ष उडाला आहे.

टॅग्स :Melghatमेळघाट