शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हा येथे जगावेगळी तारामायदेवीची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:07 IST

तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावी शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध प्रथमा अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तारामायदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जुन्या काळातील परंपरा लयाला जाऊन या आयोजनामागील उद्देश आता सामाजिक बांधीलकी व गावाची एकजूट असा उदात्त झाला आहे.

ठळक मुद्देपूजेत शेती अवजारांसह, मातीची खेळणीहीसर्व जाती-धर्माच्या नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावी शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध प्रथमा अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तारामायदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जुन्या काळातील परंपरा लयाला जाऊन या आयोजनामागील उद्देश आता सामाजिक बांधीलकी व गावाची एकजूट असा उदात्त झाला आहे.देवीपूजनाच्या अनुषंगाने परंपरेनुसार पूजेच्या पाच दिवस आधीपासून याची लगबग सुरू होते. काही कार्यकर्त्यांनी निधी गोळा केला. तर काहींनी शेतीसाठी लागणारी अवजारे सुताराकडून तयार करून घेतली. काहींनी कुंभारकडून मातीची खेळणी पूजेसोबत मांडायला तयार करून घेतली. या सर्वाची यावेळी पूजा केली जाते. मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावातून बेरड अर्थात पूजेत वापरण्यासाठी धान्य गोळा केले. पूजेचे दिवशी दुपारी १२ पासून जवळपास दोन क्विंटल शिरा तयार करण्यात आला. प्रसाद तयार होताच गावातील सर्व सीमापूजनाचा कार्यक्रम सुरू झाला. १०-१२ लोकांचा एक अशाप्रकारे पाच गट करून गावसीमेवर जाऊन पूजा करण्यात आलीे. सीमापूजनाचे कार्यकर्ते परत आल्यानंतर मंदिरात देवीपूजेला सुरुवात झाली.श्री हनुमान मंदिर संस्थानात आरती करून वेगळ्याच प्रकारच्या वाट्यांमध्ये मंदिरापासून या देवीपूजा आरतीची व मिरवणुकीची सुरुवात झाली. प्रत्येकाकडे सोपविलेली जबाबदारी ते पूजेचे साहित्य, की देवीची खेळणी, सर्वानी उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला.सीमापुजला जाणाऱ्या भाविंकाना त्रास होवू नये यासाठी हातात खराटा हातात घेण्याचे व बेरड वाटप करून धूमधडाक्यात आणि तेवढ्याच उत्साहाने करतात. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तारामाय मंदिरात उदो-उदोचा गजर करीत पोहोचल्यानंतर. येथे पुजा करून सर्व जण गावाकडे पोहोचले. जोपर्यंत लोक परत येत नाही, तोपर्यंत हनुमान मंदिरात अखंड कापूरज्योत हनुमान मंदिरात अखंड कापूरज्योत सुरू असते.हे आहे पूजेचे वेगळेपणतारामायदेवीच्या पूजेत वखर, डवरे आदी शेती साहित्यासह स्वावलंबतेचा धडा देणारा चरखा, स्वयंपाकासाठी वापरली जाणारी, परंतु खेळण्यासाठी तयार केलेली मातीची भांडी याचीदेखील यावेळी पूजा केली जाते. यासाठी गावातील सर्व धर्माचे नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहकार्य करतात.सर्व जाती-धर्मातल्या नागरिकांचा सहभाग असलेला, परंतु यामधून स्वंयपूणतेची शिकवण देणारा हा उत्सव आहे. यानंतर धार्मिक सप्ताहाला सुरूवात होते.- पंडितराव मालधुरे, सचिव, मारोती महाराज संस्थान.