लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्व कामगार व कर्मारी संघटनांच्या वतीने ८ व ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप जाहीर केला आहे.या संपात सर्व कामगार व कर्मचारी संघटनांनी सहभागी होवून केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात संप पुकारला आहे. याचाच एक भाग म्हणून संपात सहभागी सीटू,आयटक,इंटकसह ११ केंद्रीय कामगार संघटना व सलंग्नित असलेल्या विविध उद्योगातील कामगार संघटना, तसेच बॅक,विमा पोस्ट,बीएसएनएल,कोळसा, वीज या क्षेत्रातील स्वतंत्र संघटनामिळून मंगळवारी नेहरू मैदान येथून जिल्हाकचेरीवर धडक मोर्चा काढला.मोर्चेकऱ्याच्या प्रमुख मागण्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करावे व जिवनावश्यक वस्तुंच्या सट्टाबाजारावर बंदी यासारख्या माध्यमातून नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत,रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाय योजना करू न बेरोजगारीवर नियंत्रण आणावे आदींचा समावेश आहे.मोर्चात विविध कामगार, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.अंगणवाडी सेविकांचे धरणे, भजन ठिय्याअंगणवाडी सेविका,मदतनिस,पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेने आपल्या कर्मचाºयांच्या विविध मागण्यासाठी ८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदे समोर टाळ भजन ठिय्या आंदोलन केले.यावेळी विविध मागणीचे निवेदन सीईओ मनिषा खत्री यांच्याकडे संजय मापले यांच्या नेतुत्वात देण्यात आले. मंगळवारी बि.के.जाधव यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकारी जिल्हाकचेरीवर धरणे आंदोलन केले. याप्रसंगी प्रभाकर शिंदे,महेश जाधव,ममता सुंदरकर,मोहंमद हारूण,मिरा र्कैथवास,हिंमत गवई, राजू सलामे, दिलीप येते, सविता अकोलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.आॅनलाईन औषध विक्रीविरोधात निदर्शनेमहाराष्ट्र सेल अॅन्ड मेडीकल रिफ्रेजेंटीव्ह असोसिएशनने दोन दिवशीय देशव्यापी संपात सहभागी होत आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी हेमंत लोहीया,अंनत भोंबे,स्नेहा अनासने,सीमा उल्हे यांच्यासह पदाधिकारी व विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कामगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:32 IST
सर्व कामगार व कर्मारी संघटनांच्या वतीने ८ व ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप जाहीर केला आहे.या संपात सर्व कामगार व कर्मचारी संघटनांनी सहभागी होवून केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात संप पुकारला आहे.
कामगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
ठळक मुद्देदेशव्यापी संप : विविध कामगार व कर्मचारी संघटनांचा सहभाग