शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनींची कार्य आयोजना गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:14 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनजमिनींचा वापर करावयाचा असल्यास अगोदर कार्य आयोजना मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ताब्यातील ४५ लाख हेक्टर वनजमिनींबाबत गेल्या ३७ वर्षांपासून कार्य आयोजना मंजूर करण्यात आली नाही. वन संज्ञेतील ही जमीन असूनही याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार अनभिज्ञ : महसूलच्या ताब्यातील वनजमिनी बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनजमिनींचा वापर करावयाचा असल्यास अगोदर कार्य आयोजना मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ताब्यातील ४५ लाख हेक्टर वनजमिनींबाबत गेल्या ३७ वर्षांपासून कार्य आयोजना मंजूर करण्यात आली नाही. वन संज्ञेतील ही जमीन असूनही याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे.२५ आॅक्टोबर १९८० रोजी वनसंवर्धन कायदा अस्तित्वात आला. परिणामी वनजमिनींचा वापर करताना कार्य आयोजना मंजूर करणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २०२/९५ आणि १७१/९६ टी.एन. गोदावरन प्रकरणी निकाल देताना मंजूर कार्य आयोजनेनुसार वनजमिनींवर कामे झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिलेत. ही बाब अन्य विभागांच्या ताब्यात असलेल्या वन संज्ञेतील सर्व जमिनींना लागू करण्यात आली. परंतु, राज्यातील महसूल विभागाच्या ताब्यात ३३.५ लक्ष स्क्रब जमीन, तर १२ लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत (नोटीफाईड) अशी ४५.५० लाख हेक्टर वन संज्ञेतील जमीन आहे. मात्र, वनविभाग मालकीच्या या जमिनींचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य आयोजना मंजूर करून घेतली नाही. त्यामुळे महसूल विभागाने गेल्या ३७ वर्षांत या वनजमिनींची उत्पादकता रसातळाला नेल्याचे वास्तव आहे. वनसंवर्धन कायदा १९८० नियम १९८१ व २००३ नुसार प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक यांना महसूल अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार प्रदान केले आहे. तथापि, या अधिकाराचा कोणत्याही वनाधिकाºयाने वापर केलेला नाही. त्यामुळे महसूल विभागाने विविध वापराच्या नावे घेतलेल्या वनजमिनींबाबत राज्य शासनदेखील ‘सायलेंट झोन’मध्ये असल्याचे दिसून येते. वनजमिनींचे कार्य आयोजना मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. परंतु, वनविभागाने ’महसूल’च्या ताब्यातील जमिनींबाबतचा प्रस्ताव पाठविला नाही.महसूल, पोलीस अधिकारीसुद्धा दोषीभारतीय वन अधिनियम १९२७ कलम ६६ नुसार भारतीय वनसेवेच्या अधिकाºयांनी महसूल अधिकाºयांना वनगुन्हे रोखण्यासाठी परावृत्त करणे गरजेचे होते. याशिवाय कलम ७९ नुसार याप्रकरणी महसूल व पोलीस अधिकाºयांनी वनाधिकाºयांना सहकार्य आणि साहाय्य करणे बंधनकारक केले आहे. याची जाणीव असताना अस्तित्वात असलेल्या वनकायद्यातील तरतुदींचे पालन करून महसूल अधिकाºयांविरुद्ध वनगुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. मात्र, महसूल आणि पोलीस अधिकारी यांनी हा विषय बेदखल केला आहे.प्रधान वनसचिवसुद्धा हतबलमहसूलच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी राज्याचे प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी ८ डिसेंबर २०१६ रोजी शासनादेश काढला. ३१ मार्च २०१७ पर्यंत वनजमिनी परत करा, असा फतवा जारी केला. मात्र, प्रधान वनसचिव खारगे हे महसूलच्या लॉबीपुढे हतबल झाले. दोन वर्षांच्या कालावधी झाला असताना इंचभरही वनजमीन ते परत घेऊ शकले नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: लक्ष देऊन वनजमिनी परत मिळवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.