शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सापन नदीवरील ‘त्या’ पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

परतवाडा चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेअंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा रस्ता आणि पूल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जांडू कन्ट्रक्शन कंपनीतर्फे हे काम सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : धोतरखेडाच्या पुलासह इतरही कामे होणार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ऐन लॉकडाऊन'मध्येच परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धोतरखेडानजीकच्या सापन नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. जून महिन्यापर्यंत पुलाचे काम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे चिखलदरासह ७० गावांचा तुटलेला संपर्क सुरळीत होणार आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत काम सुरू करण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरस संदर्भात आदेशाचे पालन करीत हे काम करण्याचे निर्देशही दिले आहेत.परतवाडा चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेअंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा रस्ता आणि पूल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जांडू कन्ट्रक्शन कंपनीतर्फे हे काम सुरू आहे. सापन नदीवर दोनशे मीटर लांबीच्या पुलाचे काम मागील एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद पडले होते. या पुलाचे काम पावसाळ्या पूर्वी न झाल्यास चिखलदरासह परिसरातील ७० गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची भीती वर्तविली जात होती. त्यासंदर्भात 'लोकमत'ने गत आठवड्यात वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भात कॅम्प मजुरांकडून नियमांचे पालन करीत काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत पुलावरी स्लॅबचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.धारणी चांदूर बाजारातील कामे होणार सुरूधारणी, चांदूरबाजार, चिखलदरा तालुक्यातील खोगडा येथील अर्धवट व अतिआवश्यक पूल रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहेत. शासनाने महापालिका व नगरपालिका क्षेत्राबाहेरील कामे सुरू करण्याचे आदेश काढल्याने निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी परवानगी देताच इतरही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अचलपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी 'लोकमत'ला दिली.धोतरखेडा येथील सापन नदीवरील पुलाचे बांधकाम सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करीत सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. इतरही कामे परवानगी मिळताच लवकरच सुरू केले जाणार आहेत.- चंद्रकांत मेहत्रे, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, अचलपूर

टॅग्स :riverनदीcollectorजिल्हाधिकारी