शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

महिलांची ‘वीरुगिरी’

By admin | Updated: December 18, 2014 22:46 IST

वडाळीतील तुर्तास बंद असलेले दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी गुरुवारी आठ महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. यामुळे प्रशासनही हादरले. पश्चात निवासी

अमरावती : वडाळीतील तुर्तास बंद असलेले दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी गुरुवारी आठ महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. यामुळे प्रशासनही हादरले. पश्चात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चादेखील केली. मात्र लेखीपत्राशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली. मात्र दुकान हटविण्याची लेखी हमी न मिळाल्याने आंदोलक महिला आल्या पावली परतल्या. परिणामी सायंकाळी उशिरापर्यंत महिलांची वीरुगिरी सुरुच होती, हे विशेष.महिला आक्रमक, पोलिसांची भंबेरीस्थानिक वडाळी परिसरातील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोरील भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीवर गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आठ महिला चढल्या. वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करा, न्याय द्या, न्याय द्या, मतदान नकोच, प्रशासनाने दिशाभूल थांबवावी अशा घोषणा या महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून देण्यास प्रारंभ केला. अचानक पाण्याच्या टाकीवर महिलांनी दारुबंदीसाठी आंदोलन सुरु केल्याने पोलीस प्रशासनाची भंबेरी उडाली. काही वेळाने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचला. आंदोलन करणाऱ्या महिलांची समजूत घालण्याचा पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या टाकीवर कोणी पोलीस अधिकारी किंवा महिला शिपाई आल्यास दगड मारु, डोकी फोडू अशी धमकी आंदोलक महिलांनी दिली. सहायक पोलीस आयुक्त जी.एम. साखरकर, फेजपुऱ्याचे ठाणेदार डी. सी. खंडेराव, विशेष शाखा निरिक्षक अहिरे आदी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी हजर होता. दरम्यान जिल्हाप्रशासनाच्या सुचनेनुसार या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळाला उपनिवासी जिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांच्याक डे चर्चेसाठी बोलावण्यात आले. त्यानुसार काही जण पवार यांच्याकडे गेलेत. प्रशासन महिलांच्या बाजुने असल्याचे आश्वासन तेजूसिंग पवार यांनी शिष्टमंडला दिले. परंतु प्रशासनाने लेखी स्वरुपात पत्र द्यावे, ही मागणी शिष्टमंडळाने कायम ठेवली. मात्र आदेश आल्याशिवाय लेखी पत्र देता येणार नाही, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.