शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षेचे ‘विशाखा’ अस्त्र कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:15 IST

शासकीय व निमशासकीय कार्यालयातील महिलांची सुरक्षा, त्यांच्यावरील अत्याचार, हल्ले रोखण्यासाठी ‘अस्त्र’ ठरणाऱ्या विशाखा समितीचे अस्तित्त्व जिल्ह्यात कागदापुरतेच आहे.

शासकीय कार्यालयातील स्थिती : नोकरदार महिलांची घुसमट सुरूचचेतन घोगरे । लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शासकीय व निमशासकीय कार्यालयातील महिलांची सुरक्षा, त्यांच्यावरील अत्याचार, हल्ले रोखण्यासाठी ‘अस्त्र’ ठरणाऱ्या विशाखा समितीचे अस्तित्त्व जिल्ह्यात कागदापुरतेच आहे. या समस्यांबाबत अधिक जनजागृती नसल्याने अन्याय हल्ले होणाऱ्या महिलांवर अत्याचाराच्या घटनांना वाचा फूटत नाही. परिणामी शासकीय निमशासकीय नोकरदार महिलांची घुसमट वाढत आहे. सर्व शासकीय व निमशासकीय, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयामध्ये महिलांवरील लैंगिक शोषणाची तक्रार ऐकून निवाडा देण्यासाठी ‘विशाखा’ समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापनच झालेलीनाही. अमरावती शहरासह तालुका पातळीवर जवळपास १५० ते १७५ कार्यालये आहेत. काही कार्यालयांत समिती असली तरी नियमित बैठक होत नाही. वर्षभरात विशाखा समित्यांच्या माध्यमातून एकही तक्रार दाखल झाल्याची नोंद नाही. नोकरदार महिलांना बदनामीच्या भितीने तक्रार देत नसल्याचे चित्र आहे. ‘विशाखा’ समितीला विशेष अधिकारशासकीय, निमशासकीय कार्यालयात स्थापित विशाखा समितीकडे महिला आपल्यावरील अत्याचाराची लेखी तक्रार करू शकतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर समितीचे सदस्य दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत सर्व पुरावे तपासतात. त्यात दोषी ठरलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविणे, कार्यालयातून बदली करणे अशा प्रकारची शिक्षा समिती देऊ शकते. विशाखा समितीकडे न्याय न मिळाल्यास पीडित महिलाआयोगाकडे किंवा न्यायालयात दाद मागू शकते.