ऑनलाईन लोकमततिवसा : महिला शेतमजुरांचा लढा तीव्र करण्याचा निर्धार २६ मार्च रोजी झालेल्या शेतमजूर युनियन महिला मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्यावतीने गुरुदेवनगर येथील मेळाव्यात प्रमुख वक्ते युनियनचे राज्य अध्यक्ष मारुती खंदारे (जालना) व सचिव संध्या संभे (वर्धा) होत्या. अध्यक्षस्थानी बेबी सुरजुसे होत्या. उद्घाटनपर भाषण किसान सभेचे नेते महादेव गारपवार यांनी केले. दिलीप शापामोहन यांनी प्रस्ताव मांडले. मारुती खंदारे व संध्या संभे यांनी महिला शेतमजुरांच्या समस्यांवर लढा देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गठित जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष रत्नप्रभा थोरात, सचिवपदी जया गुल्हाने, उपाध्यक्षपदी सुधा झाकर्डे, सदस्यपदी चंदा काळे, मनोरमा हुरमाळे, छाया होले, गीता निमजे, ज्योती देशमुख, गुंफा गेडाम, नीलिमा वानखडे यांची निवड झाली. नगरसेविका सुरजुसे, रूपराव खंडारे, बाबाराव इंगळे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
महिला शेतमजुरांचा लढा तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:57 IST
महिला शेतमजुरांचा लढा तीव्र करण्याचा निर्धार २६ मार्च रोजी झालेल्या शेतमजूर युनियन महिला मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
महिला शेतमजुरांचा लढा तीव्र करणार
ठळक मुद्देनिर्धार : गुरुकुंजात शेतमजूर युनियन महिला मेळावा