शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत महिला असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 22:12 IST

साईनगर परिसरात दिवसाढवळ्या तरुणीचा खून , विद्यार्थिनीवर उकळते तेल टाकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न या घटनांची शाई वाळते न वाळते तोच गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत महिलांची सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देदिवसभरात पाच गुन्हे दाखल : ठाणेदारांची कर्तव्यदक्षता कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साईनगर परिसरात दिवसाढवळ्या तरुणीचा खून , विद्यार्थिनीवर उकळते तेल टाकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न या घटनांची शाई वाळते न वाळते तोच गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत महिलांची सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील महिला आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून पोलिसांनी तक्रारींचे तात्काळ दखल घेण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलेत. तथापि, त्यानंतरही महिला असुरक्षितच असल्याचे वास्तव गाडगेनगर हद्दीत घडलेल्या पाच घटनांवरून दिसून आले आहे.व्हीएमव्हीसमोरील रोडवर एका तरुणीला भर रस्त्यावर केस ओढून मारहाण करण्यात आली. दुसरी घटना विद्यापीठ परिसरातील कॉलनीत घडली. एका ६५ वर्षीय महिलेला जुन्या वादातून महिलेस मारहाण केली. विशेष म्हणजे, अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी तिला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतके गंभीर प्रकार शहरात घडत असताना आपल्या कार्यक्षेत्रात ‘स्ट्राँग पोलिसिंग राबविण्यासह असामाजिक तत्त्वांवर अंकुश राखण्यात गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.सरस्वतीनगरात महिलेस मारहाणअमरावती : सरस्वतीनगरात एक इसम एका महिलेस मारहाण करीत होता. काही नागरिक धावून गेले. यावेळी तो पती-पत्नीचा वाद असल्याचे लक्षात आले. पत्नी सहा महिन्यांपूर्वी घरून निघून गेली होती. पती शोध घेत सरस्वतीनगरात आला. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.महिलेच्या अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकीविद्यापीठ परिसरातून ६५ वर्षीय महिला जात असताना राहुल गौतम खंडारे याने जुन्या वादातून तिला मारहाण केली. तिच्या नातेवाईकसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे न दिल्यास अंगावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच राहुलला अटक केली. या घटनेमुळे धास्तावलेल्या तक्रारकर्त्या महिलेच्या कुटुंबीयांनी शनिवारी पोलीस आयुक्तालय गाठले.घरात घुसून महिलेकडील सिम पळविलेगाडगेनगर हद्दीतील एक घरात इसम शिरला आणि माझ्याशी बोलत नाही, असे म्हणत ३० वर्षीय महिलेच्या मोबाइलचे सीमकार्ड घेऊन पसार झाला. पोलिसांनी युवराज टाले (३५, रा. स्वावलंबीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.नारायणनगरात विवाहितेचा छळविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा शुक्रवारी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश ऊर्फ फफुर्डा राऊत, किशन, शंकर, विनोद, कैलास व दोन महिला (सर्व रा. लखाड, अंजनगावसुर्जी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.भररस्त्यात केस ओढून तरूणीला मारहाणएक २५ वर्षीय तरुणी शुक्रवारी सायंकाळी व्हीएमव्ही कॉलेजसमोरील रस्त्यावरून जात असताना एक तरुण तिचे केस ओढून मारहाण करतो. हा प्रकार भर रस्त्यावर घडत असताना अनेक जण बघ्याची भूमिका घेतात. विशेष म्हणजे, शुक्रवारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील अमरावती शहरात होते. त्यांनी महिला सुरक्षेसंबंधी आढावा बैठक पोलीस आयुक्तालयात घेतली. यादरम्यान ही घटना घडली. याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कुचराई न करता घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. ठाणेदार मनीष ठाकरेसुद्धा घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर चौकशी केल्यानंतर हे कृत्य आरोपी अमोल मालखेडे (३२,रा. अमरनगर) याने केल्याची बाब पुढे आली. त्याला अवघ्या तासाच्या आत पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हा