शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला बदलविण्याची महिलांमध्ये ताकद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 15:17 IST

'महिलांनी आपल्या आंतरिक गुणाचा विकास करून हिंमत व संघष कायम ठेवल्यास ती स्वत:ला सिद्ध करू शकते, राष्ट्र व समाजाला बदलू शकते.'

गुरुकुंज मोझरी (अमरावती) - महिलांनी आपल्या आंतरिक गुणाचा विकास करून हिंमत व संघष कायम ठेवल्यास ती स्वत:ला सिद्ध करू शकते, राष्ट्र व समाजाला बदलू शकते, असे प्रतिपादन महिला वक्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवात आयोजित महिला संमेलनात गुरुकुंज मोझरी येथे केले. 

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ‘कौन बनेगा करोडपती?’च्या विजेत्या बबीता ताडे, रेखा बेलसरे, संजीवनी ठाकरे, ज्योती सैरिसे, प्रभा आवारे, पंचायत समिती सभापती अर्चना वेरुळकर, मोझरीच्या सरपंच विद्या बोडखे, पंचायत समिती सदस्य रंजना पोजगे, विस्तार अधिकारी संजय पुनसे, जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अर्चना कळंबे, गटविकास अधिकारी किरण गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रेखा बेलसरे, संजीवनी ठाकरे, प्रभा आवारे यांनी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमापूर्वी निवडणूक दूत बबिता ताडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन केले. ‘बेटी बचाओ’ ही नाटिका यावेळी सादर करण्यात आली. त्याचे संयोजन रूपाली महल्ले यांनी केले होते. तन्वी पवार या चिमुकलीने ‘सावित्रीची लेक’ ही एकल नाटिका सादर केली. मीना बारबुद्धे यांनी ‘मानवतेचे पुजारी’ ही कविता सादर केली. याप्रसंगी राष्ट्रसंत संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांची भजने सादर केली. त्याचे संयोजन जया सोनारे यांनी केले होते. महिला संमेलनाचे प्रास्ताविक माधुरी भोयर यांनी केले. संचालन साक्षी पवार  व आभार प्रदर्शन सरिता चिकटे यांनी केले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीWomenमहिला