आरोपीला अटक : धामणगाव-काटपूर येथील घटनानेरपिंगळाई : लेहेगाव बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या धामणगाव-काटपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मद्यपीने जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्यादरम्यान घडली. प्रमोद आमले (रा. धामणगाव) असे आरोपीचे नाव आहे.कथित पत्रकार प्रमोद आमले हा दारू पिऊन वैद्यकीय अधिकारी महिलेला सातत्याने पैैशांची मागणी करीत असे. घटनेच्या दिवशीदेखील त्याने दारू पिऊन लेहेगाव बसस्थानकावर महिला डॉक्टरला गाठले आणि पैैशांची मागणी केली. नकार दिल्यानंतर प्रमोद याने त्यांना जबर मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. महिला डॉक्टर यांनी याबाबतची तक्रार शिरखेड पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रमोद आमले याला अटक करून त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३५३, ३५४, ३३३, २९४, ५०६ नुसार गुन्ह्यांची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार जगदीश गायकवाड करीत आहेत. नोंदविला असून शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. (वार्ताहर)
महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण
By admin | Updated: December 18, 2014 22:46 IST