शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अमरावतीमधील इर्विन रुग्णालयात महिला दगावली, तिच्या निवासस्थानी तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:20 IST

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मृत्यू झाला. मृतदेहाची हालचाल झाल्याच्या गैरसमजातून बेलपुरा येथील तिच्या निवासस्थानी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देप्रसूतीनंतर घेत होती उपचारबेलपुऱ्यात पोलीस दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मृत्यू झाला. मृतदेहाची हालचाल झाल्याच्या गैरसमजातून बेलपुरा येथील तिच्या निवासस्थानी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.पूजा वाघमारे (२७, रा. बेलपुरा), असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे ३ मे रोजी सिझेरियन झाले. १० मे रोजी पुढील उपचाराकरिता त्यांना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डफरीनच्या वैद्यकीय अधीक्षक विद्या वाठोडकर यांनी दिली. इर्विन रुग्णालयात सोमवारी सकाळी १० च्या सुमारास त्या दगावल्या. यानंतर महिलेचा मृतदेह बेलपुऱ्यात आणण्यात आला. यावेळी शरीराची हालचाल झाल्याच्या गैरसमजातून नातेवाइकांनी तिला तातडीने राजापेठ येथील एका खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी इर्विनला रेफर केले. इर्विन रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. यादरम्यान बेलपुऱ्यात लोकांची गर्दी झाली होती. कोरोनाच्या संचारबंदीतही २०० पेक्षा अधिक नागरिक गोळा झाल्याची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. यानंतर गर्दी पांगली. सायंकाळी सदर महिलेचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यू