शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील मुख्यमंत्री दत्तक गावात महिलांचा पाण्यासाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:10 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम परिवर्तन अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील महिलांनी पाण्यासाठी बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देआठवड्यातून एकदाच पाणीभीषण पाणीटंचाई शेंदोळा खुर्द येथे आठवड्यातून एकदाच पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम परिवर्तन अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील महिलांनी पाण्यासाठी बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या गावात एका आठवड्याहून अधिक कालावधीनंतर पाणीपुरवठा होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ग्राम परिवर्तन विकास अभियानात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, जलशुद्धीकरण केंद्रासह छोटी-मोठी कामे झाली तरी पाण्यासाठी आजही येथील महिलांना हातपंपावर जाऊन उपसा करावा लागतो. धगधत्या उन्हाने व सतत पावसाळा कमी झाल्याने भूगर्भातील जलाशयाची पातळी अधिकच खोलवर गेली आहे. गावातील महिला १२ वाजता शिवारातून मोलमजुरी करून आल्या की, पाण्यासाठी भटकंती ठरलेली आहे.आधीच केली होती मागणीगावात ग्राम परिवर्तन विकासाचा आराखडा तयार झाला तेव्हा पाणीगळती थांबविण्यासाठी नवीन लोखंडी पाइप लाइन, एकूण ४५२ नळांना मीटरची मागणी केली होती. पण, निधी नसल्याचे सांगत ती फेटाळली गेली.उपाययोजना सुरूग्रामपंचायतने तात्काळ उपाययोजनांसाठी चौदाव्या वित्त आयोगातून दीड लाखांचे नियोजन करण्यात आले. यामधून ग्रामपंचायत मालकीच्या दोन विहिरींचे खोलीकरण केले जाणार असून, एका विहिरीचे अकरा फूट खोदकाम झाले आहे. आणखी दोन विहिरी अधिग्रहीत करणार असल्याचे मत ग्रामपंचायत प्रशासनाने मांडले आहे.शासनाने गाव दत्तक घेतले; मात्र ते मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैव आहे. पाण्याची पातळी कमी झाली असली तरी ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिक सहन करीत आहेत.- शरद वानखडे, ग्रामपंचायत सदस्य

टॅग्स :water shortageपाणीटंचाई