शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मांत्रिकाच्या घरी बाळंतिणीचा मृत्यू; बाळही दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 13:13 IST

आरोग्य सेवा नाकारून मांत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या एका प्रसूताचा तेथेच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जुटपाणी नामक गावात घडली. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली.

ठळक मुद्देरूग्णालयातून काढला होता पळधारणी तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरोग्य सेवा नाकारून मांत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या एका प्रसूताचा तेथेच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जुटपाणी नामक गावात घडली. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली. सुखमणी रामचंद्र कासदेकर (२६, झापल) असे मृताचे नाव आहे. यापूर्वी ११ जुलै रोजी तिच्या नवजाताचादेखील मृत्यू झाला.

झापल येथील सुखमणीची ११ जुलै रोजी जुटपानी येथील भुमका परिहारच्या घरी प्रसूती झाली. तिने कमी वजनाच्या बाळाला जन्म दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने तिला व तिच्या बाळाला उपचाराकरिता ११ जुलै रोजी धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे सहा तासांतच तिच्या बाळाचा मृत्यू झाला. तिला दोन दिवसांनी सुटी देण्यात आली. त्यानंतर २५ जुलै रोजी प्रसूताला पुन्हा उपचाराकरिता आणण्यात आले. मात्र, तिने मध्यरात्री धारणी रुग्णालयातून पळ काढला. ती पुन्हा भूमका परिहारकडे पोहोचली.

आरोग्य विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले तेव्हा तिच्या घरी भूमका परिहार यांच्याकड़ून तिच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान आरोग्य यंत्रणेने तिला व तिच्या नातेवाइकांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात येण्याची विनवणी केली. नातेवाईकांनी स्पष्ट नकार देत भूमका परिहार यांचा उपचार होत नाही, तोपर्यंत आम्ही रुग्णालयात येणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. २५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजतादरम्यान भूमका परिहारचा उपचार संपल्यानंतर आरोग्य विभागाने त्या प्रसूताला सायंकाळी ७ वाजता पुन्हा उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे उपचाराकरिता भरती दाखल करण्यात आले. प्रकृती खालावत चालल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला अमरावती येथे हलविण्याची सूचना केली. परंतु, तिच्या नातेवाइकांनी व तिने अमरावती येथे जाण्यास स्पष्ट नकार दिला. शनिवारी रात्री तेथून पळ काढून भूमका परिहारचे घर गाठले व तेथे उपचार केला. तेथेच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर २६ जुलै रोजी सकाळी सहा वाजता तिचा मृतदेह घेऊन नातेवाईक झापल गावात पोहोचले.सदर मातेला आम्ही उपचारानंतर अमरावती येथे हलविण्याचे ठरविले. परंतु, तिने उपचार घेण्यास व अमरावतीला जाण्यास नकार दिला. शनिवारी मध्यरात्री रुग्णालयातून पळ काढला. त्याबाबत पोलिसांनासुद्धा माहिती देण्यात आली.- अमोल नालट, वैद्यकीय अधीक्षकउपजिल्हा रुग्णालय, धारणीप्रसूताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आशा सेविकेने दिली. आम्ही तात्काळ पोहोचलो. तेथे भुमका परिहारकडून उपचार सुरू होता. त्यांना आरोग्य सेवा घेण्याकरिता विनवणी केली. त्यांचा उपचार तीन तास चालला. तोपर्यंत आम्हाला थांबवून ठेवले.- एस. डी. नांदूरकारपरिचारिका, उपकेंद्र, जुटपानी

टॅग्स :Deathमृत्यू