शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांसह महिलेने घेतली रेल्वेतून उडी, तिघांना हलविले नागपूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 18:43 IST

दोन चिमुकल्यांसह महिलेने रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी मध्यरात्री कुरूम ते माना रेल्वे लाईनदरम्यान घडली.

बडनेरा (अमरावती) : दोन चिमुकल्यांसह महिलेने रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी मध्यरात्री कुरूम ते माना रेल्वे लाईनदरम्यान घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेसह दोन्ही चिमुकल्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते. मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने नागपूर येथे हलविण्यात आले आहे.आम्रपाली सुनील बनसोड (३०), प्रियंका सुनील बनसोड (२) व प्रथमेश सुनील बनसोड (३, सर्व रा. संजय गांधीनगर, अमरावती) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. बडनेराहून अकोलाकडे जाणा-या मालगाडी चालकाला कुरूम ते मानादरम्यान महिला व दोन चिमुकले जखमी अवस्थेत रेल्वे लाईननजीक पडून असलेले आढळले. त्यांनी ही माहिती वाकीटॉकीद्वारे माना येथील रेल्वे स्टेशन मास्तरला दिली. त्याआधारे बडनेरा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीनही जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. 

बडनेरा पोलिसांची धावपळघटनेच्या माहितीवरून बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.व्ही.चक्रे, पोलीस कर्मचारी प्रकाश सावळे, राजकुमार तेलमोरे, कादर खान यांनी घटनास्थळ गाठून रक्तबंबाळ अवस्थेतील जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविले. मध्यरात्रीची घटना असल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती. 

महिलेविरुद्ध गुन्हा ही घटना बडनेरा हद्दीतील नसल्यामुळे बडनेरा पोलिसांनी झिरोडायरी कायम करून पुढील तपासासाठी हे प्रकरण अकोला रेल्वे पोलिसांकडे सोपविले. या प्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेविरूद्ध भादंविच्या कलम ३०७ व ३०९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. जखमी महिला ही दोन ते तीन दिवसांपासून ही महिला या गावाहून त्या गावी फिरत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.