शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महिलेच्या अंगावर पानाची पिचकारी

By admin | Updated: July 11, 2017 00:07 IST

बांधकाम विभाग कार्यालयासमोरून जाणाऱ्या परिचर महिलेच्या अंगावर पानाची पिचकारी फेकणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य रविंद्र मुंदेविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदविला.

झेडपीतील घटना : जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदेविरूद्ध गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बांधकाम विभाग कार्यालयासमोरून जाणाऱ्या परिचर महिलेच्या अंगावर पानाची पिचकारी फेकणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य रविंद्र मुंदेविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदविला. ही घटना जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ७ जुलै रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली होती. यागंभीर प्रकाराबाबत सोमवारी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोग्य विभागातील परिचर मंदा साबळकर दुपारी १२.३० वाजता त्यांच्या विभागातील शासकीय दस्तऐवजाच्या झेरॉक्स प्रती काढून बांधकाम विभागासमोरून जात होत्या. त्याच दरम्यान एका शासकीय कंत्राटदाराने तोंडातील पानाची पिचकारी दारातूनच बाहेर फेकली. नेमकी ती परिचर मंदा साबळकर यांच्या अंगावर पडली. यागंभीर प्रकाराची विचारणा साबळकर यांनी बांधकाम विभागात उपस्थित असणाऱ्यांकडे केली असता कोणीही बोलायला तयार नव्हते. उलट त्यांनी साबळकर यांची खिल्ली उडविली. असे प्रकार चालतच असतात, असे उद्धट उत्तर त्यांना दिले. या घाणेरड्या प्रकाराबद्दल साबळकर यांनी आरोग्य व वित्त सभापतींकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधित कंत्राटदाराला बोलविले. मात्र, तो हजर झाला नाही. शासकीय विभागात गुटखा व पान खाऊन थुंकणे गुन्हा आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मंदा साबळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. परवानगी मिळाल्यानंतर सोमवारी त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार गाडगेनगर पोलिसांनी रविंद्र मुंदेविरुध्द भादंविच्या कलम ५०९ व मुंबई पोलीस कायदा ११५ व ११७ अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी दिली.जि.प. कर्मचारी युनियनचा पुढाकारमहिला परिचरासोबत घडलेल्या यागंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेतली. तक्रार नोंदविण्याची परवानगी मिळताच त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास पुढाकार घेतला. अशा असभ्य वागणुकीबद्दल संबंधित दोषीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी युनियनने केली.