शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिलेचा गावगुंडांकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

अमरावती : शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव दाभेरी येथील वीटभट्टीवरील मजूर महिलेचा खून गावगुडांनी केल्याची कबुली या प्रकरणात अटक ...

अमरावती : शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव दाभेरी येथील वीटभट्टीवरील मजूर महिलेचा खून गावगुडांनी केल्याची कबुली या प्रकरणात अटक केलेल्या प्रियकराने पोलिसांना दिली. या गावगुंडांनीच संपविण्याची धमकी दिली होती. त्याला घाबरून आपण आतापर्यंत वस्तुस्थिती लपवित होतो, असे त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले.

तिवसा तालुक्यातील तळेगाव दाभेरी येथील महिलेचे प्रेत शिवारात चेहरा दगडाने चेचलेल्या व पार्श्वभागात काड्या खुपसलेल्या अवस्थेत ६ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता. घटनास्थळ शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीस पाटलांच्या फिर्यादीवरून शिरखेड पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, ३७६, ३७६ (१), ३७६ (२), २०१ अन्वये गुन्हा नोंदविला होता. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे स्थानिक गुन्हे शाखा व शिरखेड पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करीत होते. सदर महिलेची ओळख पटल्यावर प्रथम तिचा वीटभट्टीवरील सहकारी नीलेश गोविंद मेश्राम (४२, रा.मनीपूर) याला ७ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. तथापि, महिलेचा मृतदेह ज्या स्थितीत आढळला, त्यावरून या गुन्ह्यात आणखी काही जण सहभागी असल्याचा होरा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होता. नीलेश हा काही तरी लपवत आहे, हे त्याच्या शारीरिक परिभाषेवरून लक्षात आले होते. त्यामुळे त्याला पोलीस कोठडीदरम्यान विश्वासात घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता नीलेशने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, तळेगाव येथील गावगुंड सुधीर रघुपती वानखडे व विनोद तुकाराम वानखडे यांनी मृत महिलेचा खून केला. यानंतर त्यांनी नीलेशला हत्येचा आरोपी होण्यास सांगितले व तसे न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

असा केला खून नीलेशच्या कथनानुसार, १ फेब्रुवारी.रोजी सकाळी १० वाजता मृत महिला ही वीटभट्टीवरून सारवायला शेण घेऊन येते, असे सांगून गेली होती. ४ फेब्रुवारीपर्यंत सुधीर व विनोद याांनी तिला त्यांचेकडे ठेवून घेतले. रघुपती वानखडे याच्या पडीक शेतात दोन्ही आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार व निर्घृण खून केला. यानंतर त्यांनी नीलेशला धमकावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

--------------

कोट येत आहे.