शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

सांगळूद येथे महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST

येवदा : चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला मारहाण करण्यात आली. केस धरून तिला घराबाहेर काढण्यात आले. ७ मार्च रोजी रात्री ...

येवदा : चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला मारहाण करण्यात आली. केस धरून तिला घराबाहेर काढण्यात आले. ७ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. येवदा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कुलदीप निरंजन इंगळे (सांगळूद) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------------

नाचोणा शिवारातून गिअर बॉक्स लंपास

दर्यापूर : खल्लार पोलीस ठाण्यांतर्गत नाचोणा शिवारातून ९ हजार रुपये किमतीचे गिअर बॉक्स लंपास करण्यात आले. ५ ते ६ मार्चदरम्यान ही घटना घडली. खल्लार पोलिसांनी शेतमालक राजेश गोंडचर (३३, खुर्माबाद) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------------

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

वरूड : चारित्र्यावर संशय घेऊन २६ वर्षीय विवाहितेला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. १५ एप्रिल २०१२ पासून हा प्रकार सुरू असल्याने ती सन २०२० पासून माहेरी राहत आहे. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी दिनेश जिचकार (रा. सावंगी जिचकार) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

वरूड येथे तरुणाला मारहाण

वरूड : येथील राजुरा नाका परिसरात अनिकेत थोरात (१९, आंबेडकर चौक) याला काठीने मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून ८ मार्च रोजी हा प्रसंग घडला. वरूड पोलिसांनी आरोपी सुरेश नेहारे, आशिष नेहारे, राहुल नेहारे (राजुरा नाका) यांच्याविरू द्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

ढाणा पुसला येथे मारहाण

शेंदूरजना घाट : माझ्या मुलीला फाशी देऊन मारले, असा आरोप करून प्रमोद मनिराम उईके (५५, ढाणा पुसला) यांना काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उईके यांच्या तक्रारीवरून शेंदूरजना घाट पोलिसांनी आरोपी राजू मसराम (ढाणा पुसला) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

विहिगाव फाट्यावरून अवैध रेती वाहतूक

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील विहिगाव येथून एमएच २७ एल ५४८२ या ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास रेती असा ५ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ८ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. रहिमापूर पोलिसांनी आरोपी मंगेश प्रजापती (३०, रा. विहिगाव) विरूद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------

चारित्र्यावर संशय, विवाहितेचा छळ

नांदगाव खंडेश्वर : चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासरच्या अन्य मंडळीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविल्याची तक्रार एका ३० वर्षीय विवाहितेने मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्याप्रकरणी भारत मुल्हार व अन्य चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------

नागझरी फाट्याजवळ अपघात

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील नागझरी फाट्याजवळ ट्रेलरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. ४ मार्च रोजी रात्री ११ वाजता हा अपघात घडला. त्रिमूर्तीनगर अमरावती येथील सूरज नागे हा दोन मित्रांसह कारंजा लाड येथून परतत असताना ही घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरजे ०४ बीजी ६९५५ या ट्रेलरच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

सावळी बु. येथे मारहाण

आसेगाव पूर्णा : बकऱ्या चारण्याकरिता इकडे कसा काय आला, अशी विचारणा करत रविकांत धाकडे (३५, रा.सावळी बु) याला मारहाण करण्यात आली. ८ मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी श्रावणकुमार उत्तम धाकडे, निखिल विजय धाके (दोन्ही. रा. सावळी बु.) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

रसुलापूर रस्ता बांधकामाविरोधात ग्रामस्थ एकवटले

चांदूर बाजार : तालुक्यातील रसुलापूर ते धानोरा या डांबरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामात निकृष्ट साहित्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे स्थानिक सरपंच, सदस्यांसह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे. रसुलापूर ते धानोरा हा १.३ किलोमीटर डांबर रस्त्याचे काम सुरू आहे.

--------------

रेल्वे गेट परिसराला अतिक्रमणाचा विळखा

चांदूर रेल्वे : शहरालगत रेल्वे गेटलगतची दुकाने हटविण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य संदीप सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेगेटसमोर दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानेही रस्त्याच्या कडेला एक फूट लागूनच असून एका दुकानापासून सुरुवात होऊन आता १२ ते १४ दुकाने झालेली आहे.

-------------------

व्याघ्र प्रकल्पाचे आडमुठे धोरण नंदनवनाच्या मुळावर

चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वाढत्या सीमारेषा पाहता दोन वर्षांपासून रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. परिणामी खड्डेमय झालेल्या रस्त्यांची परवानगी न दिल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. खराब रस्त्यांमुळे वारंवार मिळणाऱ्या खोट्या आश्वासनांचा मेळघाटात संताप व्यक्त होत आहे.

--------------

दुधविक्रेते संकटात, पशुखाद्याचे दर वाढले

कावली वसाड या गावातून रोज ५०० लिटर दूध शहरात विक्रीकरिता न्यावे लागत आहे. कावली, दाभाडा, वाठोडा या गावात दूध डेअरी असून त्यामध्ये हजारो दूध संकलित करण्यात येत आहे. गावातील काही तरुण धामणगाव रेल्वे येथे १० ते १२ किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी घरोघरी दूध विकत आहे. पशुखाद्याच्या किमती वाढल्या. परंतु दुधाचे दर वाढत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांपुढे मोठे संकट ओढले जात आहे.

---------------

निदानजी महाराज संस्थानाचा कायापालट

अंजनगाव बारी : गावाबाहेर रेल्वे मार्गालगत ३५० वर्षांपासून स्थित असलेले निदानजी महाराज संस्थान विकसनशील असूनही येथील निसर्गरम्य वातावरण बघता दररोज शेकडो पर्यटक-भाविक या स्थळाला भेट देतात. पूर्वी हे ठिकाण पडक्या स्वरुपात होते. मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला भाविकांनी स्वखर्चाने सुरुवात केली. आज हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणात २ हेक्टर जागेमध्ये तोऱ्यात उभे आहे.

----------

फोटो पी ११ बावने

कौसल्याबाई बावणे

कु-हा : येथील वाॅर्ड नं. ५ मधील कौसल्याबाई बापूरावजी बावणे (८८) यांचे ९ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, पाच मुली, जावई, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

---------

इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

अमरावती : शैक्षणिक वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ मधील खरीप हंगामातील/दुष्काळी भागातील १० वी व १२ वीचे विद्यार्थी परीक्षा शुल्कमाफीस पात्र असून, अद्याप ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या/पालकांच्या-आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

सन २०१९-२० मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आलेले आहे. संबंधितांनी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------

फोटो पी ११ सालबर्डी

महावितरण कर्मचाऱ्यांकडून आगग्रस्तांना मदत

मोर्शी : तालुक्यातील सालबर्डी येथील सुनील धुर्वे यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. परिणामी धुर्वे कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान, महावितरणच्या अभियंता सहकारी पतसंस्था, एसईएस संघटना, अमरावतीच्या अभियंत्यांनी एकूण ३० हजार रुपये आर्थिक मदत त्यांना दिली. महावितरणचे चेतन कडू, रोहित म्हस्के, हर्षल धोटे व कर्मचारी मंगेश गावंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

-------------