शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

भूमकाबाबाने काळा उंदीर सोडल्यानंतरच मेळघाटात कूपकटाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:08 IST

पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत जारिदा वनपरिक्षेत्रातील राहू व कारंज कुपातील थांबलेली लाकूड कटाई भूमकाबाबाने कुपात काळा उंदीर सोडल्यानंतरच सुरू झाली.

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत जारिदा वनपरिक्षेत्रातील राहू व कारंज कुपातील थांबलेली लाकूड कटाई भूमकाबाबाने कुपात काळा उंदीर सोडल्यानंतरच सुरू झाली.कारंज वर्तुळातील बिबलखेडा नियतक्षेत्रातील कूपकटाई झालेले सागवान लाकूड ट्रकमध्ये भरताना, क्रेनमधील लाकूड अंगावर पडून मनाजी जिरगा कासदेकर (३०, रा. कारंज) या रोजंदारी मजुराचा ३१ मार्च २०१८ ला मृत्यू झाला. यापूर्वी १० नोव्हेंबर २०१७ ला सागतोडीचे काम करीत असताना लाकूड अंगावर पडून मोतीलाल सावजी धिकार (४३, रा. राहू) हा मरण पावला. या दोन्ही घटनांमुळे मजुरांनी कूपकटाई थांबविली. काही तरी आहे म्हणूनच घटना घडत आहेत, अशी शंका त्यांच्या मनात घर करून गेली. वनअधिकारी व वनकर्मचारी यांच्याजवळ त्यांनी ही शंका व्यक्त केली. यावर त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या भूमकाबाबाचा शोध लगतच्या पाच-दहा गावांत घेतला गेला.चोबिदा येथील भूमकाबाबाला कारंज येथे आणण्यात आले. तेथे शगून बघितला गेला. शगूनमध्ये भुमकाबाबाने कारंजमधील कुपाला क्लीनचिट दिली. बाधा नसल्याचे स्पष्ट केले, तर राहू मधील कुपात बाधा असल्याचे सांगत पूजेचा प्रस्ताव पुढे ठेवला. पुजेकरिता दोन झेंडे, काला चूहा (काळा उंदीर), नारळ आणि डबकी भरून सिड्डू (दारू) व अन्य साहित्य भूमकाबाबाने सुचविले. त्यासाठी काळा उंदीर पकडण्यात आला. भूमकाबाबासह गावकरी राहूच्या कुपात पोहोचले. तेथे पूजा पार पडली. काळा उंदीर कुपात सोडला गेला. गोमूत्राप्रमाणे डबकीतील सिड्डू उपस्थितांच्या अंगावर व कुपात शिंपडली गेली आणि या पूजेनंतर कूपकटाई सुरू झाली. पूजेला वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांनीही हजेरी लावली आणि थांबलेली कूपकटाई सुरू झाल्याची माहिती उपवनसंरक्षकांनाही दिली गेली.पूर्व मेळघाट वनविभागात अंधश्रद्धेला खतपाणी : प्रशासन ढासळले, खासदारांकडेही दुर्लक्षखासदारांची अवमाननाजारिदा वनपरिक्षेत्र अंतर्गत कारंज येथील मनाजी कासदेकर याच्या अपघाती मृत्यूची माहिती खा. आनंदराव अडसूळ यांना तब्बल चार महिन्यानंतर देण्यात आली. २८ मे रोजी त्यांनी एका पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडे माहितीवजा अहवालाची मागणी केली होती. खासदारांना अहवाल अप्राप्त असल्यावरून मुख्य वनसंरक्षकांनी नाराजी व्यक्त करून १० जुलैच्या पत्रान्वये उपवनसंरक्षकांना अवगत केले होते. खा. अडसूळ यांनी जारिदा वनपरिक्षेत्रातील वनसंरक्षण व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आणि वनअधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चेकरिता जारिदा येथे १५ नोव्हेंबरला बैठक लावली होती. परंतु, सहायक वनसंरक्षक सानप यांनी अन्य क्षेत्रीय वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांना एकताई येथे गुंतवून ठेवले होते.सानप यांची कारकीर्द वादग्रस्तउपवनसंरक्षक युवराज यांच्या बदलीनंतर पूर्व मेळघाट वनविभागातील प्रशसन ढासळले आहे. सहायक वनसंरक्षक सानप तेथे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीला सर्वच कंटाळले आहेत. अधिनस्थ कर्मचारी त्यांच्या, तर ते कर्मचाºयांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करित आहेत. काहींनी आपली बदली अधेमधेच करून घेतली आहे. सानप यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. पांढरकवडा येथे त्यांच्याविरूद्ध एसीबीने गुन्हे दाखल केले. पांढरकवडा न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडल्यानंतर यलतमाळ एसीबीने प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले आहे. उमरेड अंतर्गत जुनोना भागातील बिबटाच्या पिलाच्या मृत्यूच्या अनुषंगाने सानप यांना सेवापुस्तिका ताकीद वनअधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग