शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ एका पत्राने निर्णय पलटला दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2022 00:18 IST

संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमी अमरावती जिल्ह्याचे त्या प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट पत्र लिहीत आपल्या संतप्त भावना कळवल्या, तसेच पूर्वीप्रमाणेच तो फलक लावण्याचा आग्रह धरला होता. सोबतच समाजमाध्यमातून हा विषय लावून धरला होता. अखेर माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्याने शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केवळ द्वेषपूर्ण भावनेतून एकाएकी मंत्रालयातून हटविण्यात आलेला संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा फलक शिंदे सरकारला पुनर्स्थापित करावा लागला. माजी मंत्री तथा संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या एका पत्रामुळे आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पुढे शिंदे सरकार नरमले असल्याची एकच चर्चा मंत्रालयात आहे.  महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ‘ईडी’ सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे घेतलेले जनहिताचे निर्णय बदलण्याचा शिंदे सरकारने जणू विडाच उचलला आहे. त्यातच व्यक्तिद्वेषातून म्हणा की अन्य काही कारणाने मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक एकाएकी हटविण्यात आला होता. यामुळे जनतेमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आणि त्याचे पडसाद समाजमाध्यमात उमटू लागले.  संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छता, समाजप्रबोधन आणि समाजकार्यासाठी अर्पित केले. संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक हटविल्याची बातमी समजताच संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा तथा काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी या कृती विरोधात आवाज उठवला. संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमी अमरावती जिल्ह्याचे त्या प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट पत्र लिहीत आपल्या संतप्त भावना कळवल्या, तसेच पूर्वीप्रमाणेच तो फलक लावण्याचा आग्रह धरला होता. सोबतच समाजमाध्यमातून हा विषय लावून धरला होता. अखेर माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्याने शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा फलक येत्या दोन दिवसांत नव्याने लागेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख मिटवून मंत्रालयात दशसूत्रीचा फलक त्याच जागी पुनर्स्थापित करण्यात आला. त्यामुळे जनतेच्या प्रातिनिधिक वास्तूत पुन्हा एकदा संत गाडगेबाबांचा विचार तेवत राहील, तोही केवळ ॲड. यशोमती ठाकूर यांच्यामुळे. अखेर एका पत्राने शिंदे सरकारचा निर्णय पलटला आणि मंत्रालयात दशसूत्रीचा फलक लागला.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर