निवडणूक प्रचार महासभा : नारायण राणे यांचा भाजप-सेनेवर प्रहारअमरावती : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव झटकून काँग्रेसने येत्या विधानसभा निवडणुकीत ‘जिंकणारच’ हा नारा देत राज्यात चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा संकल्प येथे सोमवारी सोडला.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राज्याचे उद्योगमंत्री तथा काँग्रेसचे विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख नारायण राणे यांच्या विशेष उपस्थितीत पश्चिम विदर्भ विभागाची कार्यकर्ता बैठक पार पडली. यावेळी ना. नारायण राणे यांनी भाजप- शिवसेनेवर प्रहार करताना नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिव्य स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता हस्तगत केली. मात्र १०० दिवसातच मोदी यांचा फुगा फुटला. जनता त्यांच्या खोट्या आश्वासनावर आता विश्वास ठेवणार नाही.
जिंकणारच! काँग्रेसचा नारा
By admin | Updated: September 22, 2014 23:10 IST