शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मृगाच्या मुहूर्तावर वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:05 IST

शनिवारी मृगाचा मुहूर्तावर पावसासह शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावलेल्या वादळाने कहर केला. धामणगाव रेल्वे तालुक्यात शंभर घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. अमरावतीलाही पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्दे५० ते ६० वृक्ष कोसळले : जिवंत विद्युत तारा लोंबकळल्या, जिल्ह्यात ८० ते ९० गावे काळोखात

अमरावती : शनिवारी मृगाचा मुहूर्तावर पावसासह शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावलेल्या वादळाने कहर केला. धामणगाव रेल्वे तालुक्यात शंभर घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. अमरावतीलाही पावसाने झोडपून काढले. झाडे वीज वाहिन्यांवर कोसळल्याने अर्धेअधिक शहर अंधारात होते. जिल्ह्यात ८० ते ९० गावे अंधारात असल्याची माहिती पुढे आली आहे.उपाययोजनेत हलगर्जीपणाज्या वृक्षांच्या फांद्या महावितरणच्या विद्युत तारेवरून गेल्या आहेत, त्या प्री-मान्सूनपूर्वी त्या तोडून बाजूला करण्याचे कामे करायला हवी होती. काही प्रभागात सदर कामे करण्यात आली, तर काही प्रभागात करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे. शहरात वादळी पाऊस आल्यानंतर जे संकट आले, त्याला तातडीने समोरे जाण्यासाठी महावितरणकडे पुरेसा मनुष्यबळ नसल्याने नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली. रविवारी दुपारी अनेक भागात वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांची ओरड वाढली होती.३३ व ११ केव्ही पुरवठा बंदवादळी पावसाची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड यांना मिळताच शहरातील ११ व ३३ केव्हीवरील विद्युत पुरवठा तातडीने बंद केला. जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन कुठलीही मनुष्यहानी वा अनुुचित घटना घडू नये म्हणून सदर पाऊल उचलण्यात येत असल्याचे विद्युत विभागाने स्पष्ट केले. कुठे कुठे तारा तुटल्या आहेत, यासंदर्भाचे सर्वेक्षण करण्यात आले. पहाटे ४ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात आली. रविवारी सकाळी ८ नंतर कामे करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड यांनी दिली आहे.

टॅग्स :Rainपाऊस