शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वादळी वर्षा

By admin | Updated: May 28, 2017 00:04 IST

मान्सूनपूर्व विजेच्या कडकडाटात आलेल्या वादळी पावसाचा फटका शनिवारी जिल्ह्याला बसला. एकीकडे पावसामुळे अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे.

उकाडा कायम : १५ मिलीमीटर पाऊस, भिंत कोसळल्याने महिला गंभीर, वृक्ष उन्मळलेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मान्सूनपूर्व विजेच्या कडकडाटात आलेल्या वादळी पावसाचा फटका शनिवारी जिल्ह्याला बसला. एकीकडे पावसामुळे अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र वादळी पावसाच्या फटक्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड झाली. भिंत कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी उकाडा कायम असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ३० मेपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार शनिवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. शहरात शनिवारी १५ मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे. नवतपातील उन्हामुळे मानवासह वन्यप्राण्यांची जिवाची लाही लाही होत आहे. उन्ह व ढगाळ वातावरणामुळे उकाड्याचे वातावरण निर्माण झाल्याने अमरावतीकरांना असह्य होऊ लागले होते. उन्हाच्या तीव्र झळांमुळे कुलर, पंखे तथा एसीदेखील थंड हवा देत नसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. दरम्यान शनिवारी अचानक मेघ दाटून आले नि धो-धो पाऊस बरसला. वीजपुरवठा खंडितअमरावती : विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मध्यंतरी उन्हाच्या प्रकोपाने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली होती. दरम्यान तीन ते चार नागरिक उष्माघाताचे बळी सुध्दा ठरले आहेत. सुर्य ढगाआड गेल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आणि वावटळीने सर्वत्र वातावरणात हवेत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आणि दुपारी ३ वाजताच्या सुमारास दमदार वादळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटांच्या पावसाने शहर ओलचिंब झाले, शहरातील सखल भागात पाणी साचले. शहरात अनेक ठिकाणी मोठमोठी कोसळली. बडनेरा भागात टिनपत्री उडाली. अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडून पडले. विद्युत प्रवाह खंडित झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीतील लाखो रूपयांचे धान्या पाण्याने ओले झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी पावसाने अमरावतीकरांची चांगलीच तारांबळ उडाली. जुन्या बडनेऱ्यातील पंचशिलनगर येथील रहिवासी प्रेमदास भिवंडे यांच्या घरावरील टिनाचे छत वादळामुळे उडाले. हे छत इलेक्ट्रीकच्या जाऊन पडल्याने या भागातील विद्युत प्रवाह खंडित झाला. याशिवाय वलगाव येथील काही झोपड्यांची नासधुस झाली. सायंकाळी ६ च्या सुमारास आलेल्या चक्रीवादळात या झोपड्या जमीनदोस्त झाल्या. याशिवाय भाजीबाजारातील महापालिकेच्या शाळेच्या आवारात एक मोठे झाड जमीनदोस्त झाले. स्थानिक बाजार समितीमध्ये उघड्यावरील धान्य वादळी पावसामुळे भिजले. १५ मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये तूर ठेवण्यासाठी ताडपत्रींची सोय करावे, असे निर्देश बाजार समितीला देण्यात आले होते. मात्र त्याच्यावर लक्ष न दिल्याने शनिवारी हा प्रसंग ओढावला. मोतीनगर, अंबिकानगर, रामनगर, यशोदानगर, बालाजी प्लॉट, सातुर्णा, विमवि परिसर, विलासनगर शारदानगर, महेंद्र कॉलनी, छाया कॉलनी, अकोली, गडगडेश्वर या भागात झाडे कोसळल्याची माहिती आहे. तसेच ग्रामीण भागात दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव येथील वादळामुळे घराचे टिनाचे पत्रे उडाल्याची घटना आहे. बाजार समितीच्या बेजबाबदार धोरणामुळे शनिवारी शेतकऱ्यांवर बाका प्रसंग ओढवला. कुठलीच उपाययोजना न केल्याने शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल धान्य वादळी पावसात भिजले. त्याची तातडीने खरेदी करावी तथा शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशा उपाययोजना बाजार समितीने राबवाव्या, अशी प्रतिक्रिया अमरावती कृषी उत्पन्न समितीचे बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी दिली. अकोली, सातुर्णा, साईनगर, कालीमाता फिडर बंदशहराला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही अकोली उपकेंद्रातून निघणारे ११ केव्ही सातुर्णा, ११ केव्ही साईनगर,११ केव्ही कालीमाता, ११ केव्ही रविनगर फिडर बंद आहे, त्यामुळे या भागातील वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे ,तसेच ३३ केव्ही वडाळी उपकेंद्र हे संपुर्ण बंद पडले आहे यामुळे प्रशांतनगर बिच्छू टेकडी, विदयापीठ परीसरातील विजपुरवठा बंद आहे, ३३ केव्ही हनुनान नगर मधून निघणारे ३ फीडर बंद आहे .११ केव्ही बुधवारा ११ केव्ही भाजीबाजार ,११ केव्ही हनुमान नगरचा समावेश होतो. ३३ केव्ही नवसारी अपकेंद्रातून निघणारे ६ फिडर बंद आहे यामध्ये ११ केव्ही कॉटन मार्केट, ११ केव्ही कटोरा नाका, ११ केव्ही नवोदय, ११ केव्ही चांगापूर ,आणि ११ केव्ही सौरभ फिडरचा समावेश आहे. तसेच २२० केव्ही बडनेरा उपकेंद्रातून निघणारे बडनेरा न्यु टाऊन व बडनेरा जुने टाऊनचा फिडर बंद असल्याने या फिडरवरील ग्राहकांचा विद्युत पुरवठा बंद आहे.भिंत कोसळल्याने महिला गंभीरवादळी पावसामुळे हैदरपुरा येथील एका घराची भिंत कोसळली. यामध्ये नूरजहां परवीन अजीम खाँ व मोहम्मद हबीब खान कलीम हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नूरजहाँ यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर हलविण्याचा सल्ला डॉक्टरने दिला होता. बाजार समितीत प्रचंड नुकसान स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला हजारो क्विंटल धान्य वादळी पावसाने भिजले. यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ३० मेपर्यंत हलका पाऊसअरबी समुद्रवर चक्राकार वारे व उत्तर प्रदेश ते अंतर्गत कर्नाटकपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती असून हा पट्टा विदर्भावरून ९०० मिटर उंचीवर गेला आहे. या स्थितीमुळे विदर्भासह मराठवाड्यावर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ३० मेपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी हलका पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. वादळी वाऱ्याचा महावितरणला फटकावादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने शहर तथा जिल्ह्यातील विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी विद्युत यंत्रणेवर झाडे कोसळल्याने हा प्रसंग उद्भवल्याचे महावितरणने म्हटले आहे. खंडित झालेला वीज पुरवठा लवकरच पूर्ववत होणार असल्याचा दावाही महावितरणने केला आहे. तुरळक गारपीटवादळासह आलेल्या अवकाळी पावसादरम्यान हरभऱ्याच्या आकाराएवढी तुरळक ठिकाणी गारपीट झाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ आणि वाढोणा रामनाथ, चांगापूर, भातकुली येथे गारपीट झाल्याचे वृत्त आहे. चांदूरबाजार तालुक्यातील खराळा, खरवाडी, तळवेल याभागातही वादळी पावसादरम्यान गारपीट झाली. लाखनवाडी परिसरात गारपीटीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळादरम्यान खंडित झालेला वीजपुरवठा अद्यापपर्यंत पुर्ववत झाला नव्हता. १० जूनला मान्सून येणार जिल्ह्यात पडलेला पाऊस हा मान्सूनपूर्व असून मान्सूनची वाटचाल सद्यस्थितीत सुरू झाली आहे. सद्यस्थितीत मान्सून श्रीलंकेतून भारताकडे आगेकूच करीत आहे. तो २९ मेपर्यंत केरळात पोहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनचा प्रवास विदर्भाच्या दिशेने सुरू होणार आहे. १० जूनपर्यंत मान्सून विदर्भात धडकण्याची शक्यता आहे. वन्यप्राण्यांना दिलासाजिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्याने जंगलातील वातावरणसुद्धा प्रफुल्लीत झाले आहे. या वातावरणात वन्यप्राण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या सरीमुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्यामुळे वन्यप्राण्यांना पावसाळ्यातील वातावरणाची चाहूल लागली आहे. जीवित हानी नाहीशहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी दुपारी व सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाने कहर केला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. एका महिलेच्या अंगावर भिंत पडून ती जायबंदी झाली असली तरी जिल्ह्यात कुठेही या पावसाने जीवित हानी झालेली नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.