शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

दिवाळीला नेणार का घरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:54 IST

ज्या जन्मदात्यांनी आयुष्य दिले, जीवन तेजामय केले, त्यांनाच कुलदीपक विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणत्या पणतीचेही दर्शन घडत नाही. दिवाळीच्या पर्वावर तरी आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील, अशी अपेक्षा वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देवृद्धाश्रमातील वृद्धांची आस : काळजाच्या तुकड्याला आर्त हाक

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : ज्या जन्मदात्यांनी आयुष्य दिले, जीवन तेजामय केले, त्यांनाच कुलदीपक विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणत्या पणतीचेही दर्शन घडत नाही. दिवाळीच्या पर्वावर तरी आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील, अशी अपेक्षा वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्त करीत आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापित केलेल्या गुरुकुंज मोझरी येथील वृद्धाश्रमात ४० पेक्षा अधिक वृद्ध आहेत. यांसह जिल्ह्यात एकूण आठ वृद्धाश्रम आहेत. पोटच्या गोळ्याने नाकारल्याने अनेकांची रवानगी तेथे झाली आहे. ते आश्रमात अखेरचा घटका मोजत आहेत. दिवाळीला सोमवारी वसुबारसपासून सुरुवात होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर काही वृद्धाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता, आयुष्यात किती कष्ट सोसले, याची गणित त्यांनी मांडले. त्यापैकी कुलदीपकांसाठी खाल्लेल्या खस्ता वजाबाकीच्या खात्यात होत्या. कुटुंबापासून दुरावलो असलो तरी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची इच्छा यापैकी अनेकींनी व्यक्त केली.श्रीगुरुदेव सेवा मंडळाची दिवाळीअखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने स्थापित केलेल्या वृद्धाश्रमातच या वृद्धांची दिवाळी साजरी होईल. यानिमित्त त्यांना नवे वस्त्र, पंचपक्वान्नाचे ताट वाढले जाते. या सणप्रसंगी त्यांना आनंदी ठेवता यावे, हा यामागे उद्देश असतो.आयुष्याची सायंकाळ वृद्धाश्रमातज्यांनी तळहातावर चटके झेलत पोटच्या गोळ्याला मोठे केले, त्यांना वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळी दिवस कंठण्याची वेळ आली आहे. चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे, या गोष्टी जन्मदात्यांनी शिकविल्या. त्यांची दिवाळी वृद्धाश्रमात जात आहे.कुलदीपक कधी देणार वेळ ?मुलाचा जन्म हा आईचा पुनर्जन्म असतो. आयुष्याचा आधार मिळेल, मृत्यूनंतर त्यांच्या खांद्यावर यात्रा पूर्ण होईल, अशी आशा प्रत्येक आई-वडिलांची असते. परंतु, त्यांनीच वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला. वर्षातून केवळ दहा मिनिटे भेटायला येतात. नातवंडांना खांद्यावर खेळवण्याऐवजी अश्रू ढाळण्यातच दिवस जात आहेत, अशी कैफियत एका वृद्धेने मांडली.