शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार कोटींच्या रेतीमुळे अमरावती पोलिसांवरचा डाग पुसला जाणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 19:21 IST

अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता.

- चेतन घोगरेअमरावती : अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. या कार्यवाहीमागील मुख्य कारण हे नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले आयपीएस जि. विजयकृष्ण यादव यांनी अमरावती येथील रेती व्यवसायिकांकडून लाखो रूपयांची लाच घेतल्यामुळे अडकले होते. याचा वचपा काढण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी ही राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केल्याचे बोलले जात आहे.काही महिन्यांपूर्वी अमरावती-नागपूर महामार्गावर असलेल्या तिवसा पोलीस स्टेशनमध्ये तीन महिन्यासाठी आलेले परीवेक्षाधीन आयपीएस अधिकारी जि. विजयकृष्ण यादव यांनी २७ मार्च ते २५ जून या कार्यकाळात ३० हून अधिक मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये सर्वात मोठी कारवाई म्हणजे १८० जनावरे, ५४ आरोपी व २० ट्रक तसेच अवैध रेतीची वाहतूक करणारे १५ ट्रक, १५ आरोपी तसेच १ कोटी ५० लाखाचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील रेतीचा तस्कर म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीचेसुद्धा रेतीचे ट्रक पकडण्यात आले होते. त्याच रेती तस्कराने आयपीएस यादव यांच्यावर लाचलुचपत विभागाचा सापळा रचून लाखो रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या सर्व प्रकरणांमध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांची प्रतिमा राज्यभरात मलीन झाली होती. या सर्व बाबींचा वचपा काढण्यासाठी सध्या अमरावती जिल्ह्याला लाभलेले परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ जिल्ह्यातून होणा-या अवैध रेती घाटावरून होणा-या ३२ ट्रकवर धामणगाव रेल्वे तालुक्याच्या हद्दीमध्ये राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केली व दोन कोटींच्यावर रेतीसाठा जप्त केला. तसेच त्याआधी परतवाड्यावरून जाणारा देशी दारूचा टि. पी. वाहतुकीचा माल हा रासेगावला न जाता रेतीघाट परिसरात अवैध वाटप करत असताना पकडला. त्यामुळे दारू व्यवसायिकांनी चांगलाच धसका घेतला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यवाहीमुळे अमरावती ग्रामीण पोलिसांवर असलेला डाग पुसवून टाकल्याचे पोलीस विभागात बोलले जात आहे.रेतीवाल्यांकडून सावध राहा !याआधी आयपीएस अधिका-याने मोठी कारवाई केली म्हणून एसीबी विभागाने पोलीस अधिका-याची विकेट घेतली आहे तर आता राज्यामधली सर्वात मोठी कारवाई आहे. आता रेतीवले कोणाचा बळी घेणार, त्यामुळे रेतीवाल्यांकडून सावध राहण्याचा पोलीस विभागात या विषयाची चांगलीच चर्चा रंगत आहे.