शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

सहा वर्षांपर्यंत बदली होणार नाही

By admin | Updated: April 12, 2015 00:32 IST

केंद्रीय कृषी संचालक डी. के. शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, महापौर रिना नंदा, मधुकरराव किंमतकर, कृषी शास्त्रज्ञ...

अमरावती : केंद्रीय कृषी संचालक डी. के. शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, महापौर रिना नंदा, मधुकरराव किंमतकर, कृषी शास्त्रज्ञ सी. डी. मायी, गिरीश गांधी, सोमेश्वर पुसदकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, चंद्रकांत कलोती उपस्थित होते. नवीन अधिकाऱ्यांची विदर्भात नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ६ वर्षे बदली होणार नाही, अधिकाऱ्यांचे प्रमोशन पाहिजे असेल तर स्थानांतर विदर्भात व नंतर मराठवाड्यात होईल. त्यांनी प्रमोशन नाकारले तर त्यांना पुढील ३ वर्षे प्रमोशन नाही. अधिकाऱ्यांची एकाच भागात राहायची मानसिकता असल्याने प्रशासकीय धोरणात बदल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.अमरावती पंचतारांकित एमआयडीसीमध्ये टेक्सटाईलचे दोन कारखाने सुरू आहेत. पुढील १५ ते २० दिवसांत आणखी एका कारखान्याच्या उद्घाटनाला आपण येणार आहोत. येत्या दोन महिन्यांत आणखी ८ नवीन युनिट येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत एनटीसीच्या अनेक गिरण्या बंद आहे. विदर्भ व मराठवाड्यात गिरण्या उभारणीच्या अटीवर त्यांना जागा विकण्याची परवानगी देण्यात येईल. सध्या ४ गिरण्या उभारण्याची तयारी एनटीसीने दाखविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन पीक घेतो. हा कापूस आठ प्रक्रियेतून जातो, मात्र त्या प्रक्रिया तयार केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही यासाठी पणन विभागाद्वारा ‘व्हॉल चेन’ तयार करण्यात येत आहे. जिथे पिकतो त्याच ठिकाणी कृषी मालावर प्रक्रिया केली गेली पाहिजे, तरच शेतमालास बाजारभाव मिळून रोजगाराची निर्मिती होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विदर्भातील शेतकरी आत्महत्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अनेक शेतकरी मनोवैज्ञानिक दबावात आहेत. यामधून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबविण्यात येणार आहे. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची माहिती घेतली जात आहे. यामुळे योग्य व्यक्तीलाच पॅकेजचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विदर्भातील अनेक प्रकल्प पडून आहे. कारंज्याचा प्रकल्प महाआॅरेंजने घेतला. विकास साधायचा असेल तर शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावापर्यंत योजना आणाव्यात, असे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांविषयी बोलताना परिवहन मंत्री म्हणाले, सोयाबीन निर्यात झाल्यानंतर भाव कोसळतात. कापसाचा मोठा ग्राहक देश चीन पुढील तीन वर्षे कापूस घेणार नाही, ४० टक्के बांग्लादेश घेतो तोदेखील पुढे घेणार आहे. त्यामुळे कृषी खात्याला याविषयी निर्णय घ्यावा लागणार आहे, निसर्ग कोपला आहे, हजारो हातांचा रोजगार हिरावणाऱ्या मशिनी आम्हाला नको आहेत, असे परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमेश्वर पुसदकर यांनी केले. संचालन व आभार नितीन जगदळे यांनी केले.किसान एकता मंचाची नारेबाजीमुख्यमंत्री शेतकरी आत्महत्याविषयी बोलत असताना प्रेक्षकांत बसलेल्या किसान एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फडकवीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, अशी नारेबाजी केली. यावर तुमची मागणी मला कळली यावर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केली प्रदर्शनीची पाहणीकृषी विकास प्रदर्शनीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. बचतगटांच्या स्टॉलला भेट देऊन वस्तूची माहिती जाणून घेतली. प्रगत कृषी तंत्राची प्रात्यक्षिक पाहिले तसेच प्रदर्शनीत ग्रामीण भागाची फलक जागोजागी असल्याचे कौतुक केले.