शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आव्हान स्वीकारले, काश्मीरमध्ये जाऊन करणार हनुमान चालीसा पठण, पण.. नवनीत राणांचे मुख्यमत्र्यांना प्रतिआव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 16:10 IST

काश्मीर भारताचा भाग आहे आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणे कठीण आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मी तिथे जाऊन हनुमान चालीसा पाठ करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

अमरावती : हनुमान चालीसावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. काल औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. तसेच हनुमान चालीसा प्रकरणांवर बोलताना त्यांनी, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्त्व्यावर खासदार नवनीत राणांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. 

नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं आहे. काश्मीर भारताचा भाग आहे आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणे कठीण आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मी तिथे जाऊन हनुमान चालीसा पाठ करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करतील त्या दिवशी मी काश्मीरमध्ये कधी आणि केव्हा हनुमान चालीसा वाचणार याची तारीख व वेळ जाहीर करेल, असे त्या म्हणाल्या. मंदिर, हनुमान चालीसा पठण आपल्याला महत्वाचे वाटत नसेल, तर तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणून कसं काय रिप्रेझेंट करू शकता, असे म्हणत नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. 

औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, काल त्यांनी औरंगाबादच्या जनतेच्या समस्यांवर मुख्यमंत्री म्हणून बोलायला हवे होते, पण त्यांनी मला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान दिले. त्यांनी तेथील जनतेच्या समस्यांवर, पाणी प्रश्नावर का नाही चर्चा केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासह, काश्मीरमधील टार्गेट किलिंग आणि काश्मिरी पंडितप्रकरणावर बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह देशवासीयांसोबत आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक पाऊल हे सरकार उचलत आहेत. जनतेला त्यांच्यावर विश्वास असून देशभरातील नागरिक त्यांच्यासोबत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरे