शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ईसीएचएसच्या इमारतीसाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:47 IST

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस पॉली क्लिनिक) अमरावतीच्या नवीन इमारत उभारण्याकरिता जोग स्टेडीयमच्या मागील बाजूला ६ हजार ३०० स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळविला आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । मेजर जनरल राजेश कुंद्रा; अमरावती इसीएचएस पॉलीक्लिनिकला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस पॉली क्लिनिक) अमरावतीच्या नवीन इमारत उभारण्याकरिता जोग स्टेडीयमच्या मागील बाजूला ६ हजार ३०० स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळविला आहे. तेथे तीन मजली सुसज्य अशा नवीन इमारतीच्या बांधकामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरिता आमचे प्रयत्न सुरू असल्याचे महाराष्ट्र व गोवा सब एरियाचे जनरल कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल राजेश कुंद्रा (सेना मेडल) यांनी सांगितले.शुक्रवारी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी शिवाजीनगर स्थित अमरावती इसीएचएस पॉली क्लिनिकला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अमरावती इसीएचएस पॉली क्लिनिक माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असल्याने तसेच देशातील ४२६ पॉली क्लिनिकमध्ये सात राज्यांमधून अमरावतीचेसुद्धा उत्कृष्ट कार्य असल्याने त्यांना या कामगिरीबद्दल वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या निधीचा एक धनादेश पाली क्लिनिकचे आॅफिसर इन्चार्ज कॅप्टन अरविंद चांडक व त्यांचे सहकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरवदेखील करण्यात आला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच ज्या ठिकाणी इसीएचएस पॉली क्लिनिकची नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्या जागेची पाहणीसुद्धा त्यांनी केली.यावेळी सीएडी पुलगाव स्टेशन कमांडर ब्रिगेडीयर गोलडस्मित, अ‍ॅडम कमांडर लेफ्टनंट कर्नल संजीवकुमार उपस्थित होते. यावेळी प्रेझेंटेशनव्दारे पॉली क्लिनिकचे आॅफिसर इर्न्चाज कॅप्टन अरविंद चांडक यांनी पॉली क्लिनिकच्या प्रगती अहवालाची माहिती सादर केली.माजी सैनिकांना आरोग्य सेवाअमरावती येथील ईसीएचएस पॉली क्लिनिकमध्ये माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना चांगली आरोग्यसेवा देण्याचा मानस असल्याचे ईसीएचएसचे आॅफिसर इन्चार्ज कॅप्टन अरविंद चांडक यांनी सांगितले. पॉली क्लिनिकमध्ये पॅथॉलॉजी लॅब, दंत चिकित्सक सेवा इतर आरोग्य सेवा दिली जाते. शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठविले जाते.

टॅग्स :SoldierसैनिकHealthआरोग्य