शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

बंद पडणाऱ्या दूध योजना पीपीपी तत्त्वावर पुनर्जीवित होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:45 IST

दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनर्जिवित करण्यास व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची ई-निविदा प्रक्रियाद्वारा नियुक्ती करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली.

ठळक मुद्देशासनाचा पुढाकार : जिल्ह्यात तीन शीतकरण केंद्रे बंद

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनर्जिवित करण्यास व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची ई-निविदा प्रक्रियाद्वारा नियुक्ती करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, परतवाडा व सेमाडोह (ता. चिखलदरा) ही तीन शीतकरण केंद्रे दूध मिळत नसल्याने बंद पडली आहेत.पीपीपी तत्त्वावर बंद पडलेल्या किंवा पडणाºया संस्था पुनर्जिवित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या १७ एप्रिल २०१४ च्या शासननिर्णयानुसार विहित प्रक्रियाद्वारा तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात दिली होती. २०१४ च्या शासन निर्णयाची मुदत संपुष्टात आल्यानंतर पीपीपी प्रक्रियाद्वारा तांत्रिक सल्लागारांच्या नियुक्तीस पुढीत मुदतवाढ दिल्याचे आढळले नव्हते. त्यामुळे तांत्रिक सल्लागाराऐवजी ई-निविदा प्रक्रियाद्वारा तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करण्याचे शासनाने ठरविले होते. अमरावती विभागातही अनेक शीतकरण केंद्रे बंद होण्याच्या स्थितीत आहेत.दुधाला भाव नाहीशेतीला जोडधंदा म्हणून दुग्धविकास व्यवसायाला चालना मिळण्यासाठी शासनाने जिल्ह्यात तीन शीतकरण केंद्र स्थापन केले. पण, ग्रामीण भागात शासकीय दुधाला चांगला भाव मिळत नसल्याने मोर्शी चार हजार लिटर क्षमतेचे दूध शीतकरण केंद्र बंद पडले आहे, परतवाडा चार हजार लिटर क्षमता व सेमाडोह पाच हजार लिटर क्षमतेची शीतकरण केंद्र बंद पडली आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार या केंद्राचे पुनर्जीवित करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली तीन शीतकरण केंद्रे बंद आहेत. दुधाच्या साठवण क्षमतेनुसार दूध मिळत नसल्याचे मुख्य कारण आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- संपत जांभुळे,जिल्हा दुग्धव्यवसायविकास अधिकारी, अमरावती