शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खुर्चीला चिकटलेल्यांची होईल का बदली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:20 IST

विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा सवाल : जुनच्या पहिल्या आठवड्यात येणार यादी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.तत्पुर्वी ३१ मे रोजी बदलीचा आदेश निघण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने एकाच टेबलवर राहून मलिदा लाटणाºयांची बदली होईल का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.८ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत तुर्तास १५८८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात वर्ग १ व वर्ग २ चे प्रत्येकी १३, वर्ग ३ चे ४३० तर वर्ग ४ चे ११३२ कर्मचाºयांचा समावेश आहे. यातील वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाºयांकडे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाºयांच्या प्रामुख्याने बदल्या केल्या जातात. यात अधीक्षकांसह वरिष्ट व कनिष्ट लिपिक, सहायक अधीक्षक, लेखापाल, शिपाई, बिटप्यून , स्वास्थ्य निरिक्षक आदींचा समावेश आहे. यातील अनेक कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर कार्यरत आहेत. अनेक टेबलवर कमिशन मिळत असल्याने आणि ‘वरचा खर्च ’वरच्या वर भागत असल्याने अनेकांकडून बिदागीचा टेबल सोडण्याचा मोह सुटत नाही. आयुक्त हेमंत पवार यांनी अशा चिपकू कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याची सुचना विभागप्रमुखांसह प्रभारी उपायुक्त महेश देशमुख, सहायक आयुक्त राहूल ओगले यांना दिले होते. बरहुकूृम अशा चिपकूंसह बदलीस पात्र असणाºयांची यादी तयार करण्यात आली आहे. यात कर आणि स्वच्छता विभागात व्यापक फेरबदल करण्यात येणार असून काही सहायक आयुक्तांसह उपअभियंत्यामध्येही खांदेपालट करण्यात येणार आहे.२८ व २९ मे रोजी आयुक्त नसल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यात बदलीचे आदेश काढले जाण्याची शक्यता आहे.बदली आदेश पाळणार ?ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात , त्यांनी तातडीने बदलीस्थळी रुजू व्हावे , अन्य कर्मचारी रुजू होण्याची प्रतिक्षा न करता विभागप्रमुखांनी बदलीप्राप्त कर्मचाऱ्यास ‘रिलिव्ह’ करावे, सामान्य प्रशासन विभागास त्याबाबत अहवाल द्यावा, अन्यथा शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा बदली आदेशात असतो. मात्र आयुक्तांच्या त्या आदेशाला हरताळ फासत अनेक कर्मचारी बदली ठिकाणी रुजू होत नाहीत. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी बदलीचे आदेश संबंधित कर्मचारी अधिकारी पाळतात की कसे , हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.