शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

वन्यप्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

जंगल सफारीनिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा मानवी हस्तक्षेप आता कमी होणार आहे. त्यामुळे हे गेट लावल्याने वरूडा जंगलातील वन्यप्राण्यांनी अधिवासाकरिता मोकळा श्वास घेतला आहे. अन्य प्रजातीच्या वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याने वरूडा जंगलाची समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

ठळक मुद्देवरुडा जंगलात लावले तीन गेट : मानवी हस्तक्षेप टळणार, वनविभागाचे पाऊल

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्क     पोहरा बंदी : चिरोडी वर्तुळातील प्राण्यांचे वास्तव्य असणाऱ्या वरूडा जंगलातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तीन लोखंडी गेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे जंगल सफारीनिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा मानवी हस्तक्षेप आता कमी होणार आहे. त्यामुळे हे गेट लावल्याने वरूडा जंगलातील वन्यप्राण्यांनी अधिवासाकरिता मोकळा श्वास घेतला आहे. अन्य प्रजातीच्या वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याने वरूडा जंगलाची समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.या जंगलात चारा, पाणी मुबलक असल्याने वन्यप्राण्यांना पोषक असे वातावरण असल्याने वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. या जंगलात सफारीदरम्यान पर्यटकांना बिबट्यासह वन्यप्राणी पहावयास मिळत होते. म्हणूनच आठवड्याच्या प्रत्येक रविवारी वरूडा जंगल पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात होता. वरूडा जंगल अधिवासाकरिता अनुकूल असल्याने या जंगल भागात वन्यजीवाचा अधिवास सातत्याने वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात वरूडा जंगलातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी व मानवी हस्तक्षेपाला लगाम लावण्याकरिता चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात वरूडा बीटचे वनरक्षक अतुल धस्कट, वनमजूर शालिक पवार यांनी तेथील तीन मुख्य रस्ते लोखंडी गेट लावून बंद केले आहे. जंगलात मुख्य रस्त्याच्या ‘टी पॉईंट’वर एक ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला असून, या ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झालेल्या वन्यप्राण्यांची दरदिवशी नोंद घेतली जात आहे.या वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी दोन कृत्रिम पाणवठे, दोन वनसंरक्षण कुटी, वनतळ्यांमध्ये विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू असून, कृत्रिम पाणवठ्याची नियमित स्वच्छता केली जात असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभाग