अमोल कोहळे।आॅनलाईन लोकमतपोहरा बंदी : वडाळी व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल दिसून येत आहे. हे पाणवटे वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरले आहेत. उन्हाळ्यात पाणीपातळी खालावत असल्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटतात, अशा प्रसंगी वन्यप्राण्यांना काही नैसर्गिक, तर कृत्रिम पाणवठ्यांवर अवलंबून राहावे लागते. पाणीस्रोत कमी झाल्याने पाणवठेच वन्यप्राण्यासाठी वरदान ठरत आहे. यंदा पोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात तब्बल १५ पाणवटे तयार करण्यात आले आहेत. जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांनी पाणवठ्यांचा आधार घेतला आहे. वनविभागाने लावलेल्या त्या ट्रॅप कॅमेºयात दररोज पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची रेलचेल सुरू असल्याची छायाचित्रे कॅमेºयात कैद होत आहेत. पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची रेलचेल सुरू झाली आहे.वरुडा जंगलात बिबट, हरिण, रोही, निलगाय, निकरा, भेडकी, चितळ, काळवीट, देवगाई, ससे, लाडोर, मोर, सायळ, रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून आले आहे. या वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता होऊ नये, याकरिता वरुडा जंगलात १० आणि पोहरा जंगलात पाच पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सध्या या जंगलात मोर-लांडोराची संख्या अधिक आहे. या राष्ट्रीय प्राण्याला पाणीसाठा कमी पडू नये म्हणून दोन्ही वर्तुळातील पाणवठे पाण्याने भरले आहेत.
पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांची तृष्णा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 22:25 IST
वडाळी व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल दिसून येत आहे.
पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांची तृष्णा
ठळक मुद्देपशूंची रेलचेल : वरुडा जंगलात १०, पोहºयात पाच पाणवठे