शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज मचानीवर वन्यप्राणी गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. दोन वर्षांनंतर सर्वसामान्य निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट बफर, अकोला व पांढरकवडा अशा सहा वन्यजीव विभागांत असलेल्या नैसर्गिक व कृत्रिम अशा  एकूण ४६६ पाणवठ्यांवर प्राणी गणनेकरिता मचानी तयार केल्या आहेत. येथे ठिय्याकरिता निसर्गप्रेमी व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून सशुल्क आरक्षण पूर्ण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सहा वन्यजीव विभागांतर्गत १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला मचानीवरून वन्यप्राणी गणना होणार आहे. वाघ, अस्वल, रानगवे, दिवटे, लांडगे, कोल्हे या वन्यप्राण्यांसह सरपटणारे प्राणी व पक्ष्यांचे दर्शन वन्यप्रेमींना होणार असून, त्याची नोंद त्यांना करावी लागणार आहे. नियमांचे काटेकोर पालन यादरम्यान करावे लागणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. दोन वर्षांनंतर सर्वसामान्य निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट बफर, अकोला व पांढरकवडा अशा सहा वन्यजीव विभागांत असलेल्या नैसर्गिक व कृत्रिम अशा  एकूण ४६६ पाणवठ्यांवर प्राणी गणनेकरिता मचानी तयार केल्या आहेत. येथे ठिय्याकरिता निसर्गप्रेमी व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून सशुल्क आरक्षण पूर्ण झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी, सिपनाच्या उपवनसंरक्षक दिव्या भारती, गुगामलचे उपवनसंरक्षक सुमंत सोलंखे, अकोटचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, अकोला येथील विभागीय वनअधिकारी निमजे व पांढरकवडाचे विभागीय वन अधिकारी किरण जगताप यांच्या मार्गदर्शनात १६ मे रोजी प्राणी गणना होत आहे.कोरोनामुळे दोन वर्षांत फक्त वन कर्मचारी सहभाग होते. यावर्षी १६ मे रोजी ४२४ निसर्गप्रेमी व ५८ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. बोर्डिंग पॉइंट ते मचाणपर्यंत वन विभागाच्या वाहनाने पोहोचवणे व परत आणण्याची व्यवस्था केलेली आहे.

अनेकांची निराशाऑनलाइन पद्धतीत अनेकांना सहभागी होता न आल्याने निराशा झाली आहे. तथापि, अमरावती जिल्ह्यासह अकोला, औरंगाबाद, बैतुल, भंडारा, हैदराबाद, जाफराबाद, मुंबई, पुणे, यवतमाळ, किनवट, परभणी, नांदेड, नागपूर, वाशिम, वर्धासह राज्यभरातील विविध ठिकाणांवरून वन्यप्रेमींनी यात सहभाग घेतला आहे.

 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पforest departmentवनविभाग