शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:54 IST

संशयी पतीने प्रथम पत्नीच्या शरीरावर चाकूचे वार केले. ती वेदनेने विव्हळत आहे, मेलेली नाही, हे समजताच गळा दाबून तिचा जीव घेतला.

ठळक मुद्देसंशयाने केला संसार उद्ध्वस्त : एरंडगाव येथील घटना

आॅनलाईन लोकमतअंजनगाव बारी/चांदूररेल्वे: संशयी पतीने प्रथम पत्नीच्या शरीरावर चाकूचे वार केले. ती वेदनेने विव्हळत आहे, मेलेली नाही, हे समजताच गळा दाबून तिचा जीव घेतला. यानंतर पतीने पलायन केले. समाजमन सुन्न करणारी ही घटना चांदूररेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एरंडगाव येथे घडली.अर्चना राहुल वानखडे (२५) असे मृताचे व राहुल रामराव वानखडे (२७) असे खून करणाºया पतीचे नाव आहे. सोमवारी सकाळी अर्चना ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली व सोबच चाकू तिचे सासरे रामराव यांच्या निदर्शनास आल्यानंतर या खुनाला वाचा फुटली. यासंदर्भात पोलीस पाटील सतीश देशमुख यांनी चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यातील तक्रारीनुसार, हे दाम्पत्य शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथील मोहन गुलाबे यांची कन्या अर्चना हिचे ७ वर्षांपूर्वी राहुलशी लग्न झाले. लग्नानंतर काही वर्षांनी राहुल पत्नी अर्चना हिच्या चारित्र्यांवर संशय घेत होता. यातूनच त्यांचे वाद झडत असत.रविवार, ४ फेब्रुवारीला निजानिज होण्यापूर्वीही त्यांच्यात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास राहुलने झोपेत अर्चनाच्या शरीरावर आधी चाकूने वार केले. मात्र, ती मेलेली नाही, हे लक्षात येताच त्याने गळा दाबून तिचा खून केला. यानंतर राहुलने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार ब्रम्हा शेळके यांच्या नेतृत्वात चांदूररेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.चांदूररेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांत भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला बडनेरा-यवतमाळ मार्गावरून अटक केली. पोलिसांनी अवघ्या सहा तासांत शोधमोहीम राबवून आरोपी राहुल वानखडेला जेरबंद केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.राहुलला दारूचे व्यसनराहुल वानखडेला दारुचे व्यसन जडले असून तो आई-वडिलांना त्रास देत असे. त्याच्या त्रासापायी मांजरी वडील मांजरी म्हसला येथे राहण्यास गेले होते. दोन महिन्यापूर्वीच ते यरंडगावला आले आहेत. राहुल पत्नीसमवेत एरंडगाव येथे राहत होता.मुले झाली पोरकीराहुल आणि अर्चनाला दोन मुले. पहिला दोन वर्षांचा आणि दुसरा अवघ्या सहा महिन्यांचा. दारूड्या राहुलमुळे या मुलांचे संगोपन अर्चनाच मजुरीला जाऊन करीत होती. आता अर्चनाचा खून झाल्यामुळे आईविना दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.