शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवजात ‘नकोशी’ झाल्याने ‘तो’ पुन्हा चढला बोहल्यावर; विवाहितेला घराबाहेर हाकलले

By प्रदीप भाकरे | Updated: February 24, 2023 13:35 IST

नात नको नातूच हवा म्हणत सासरकडून छळ

अमरावती : पोटची मुलगी ‘नकोशी’ झाल्याने पत्नीला घराबाहेर हाकलून देत एकजण पुन्हा बोहल्यावर चढला. तत्पुर्वी, आम्हाला नात नव्हे, नातूच हवा, असे म्हणत सासरच्या मंडळीने अनन्वित छळ केला, अशी तक्रार एका विवाहितेने स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. २३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी तिच्या पतीसह सासारच्या मंडळीविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदविला.             तक्रारीनुसार, काही वर्षांपुर्वी येथील एका तरूणीचे लग्न झाले. सुरूवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये सासरच्या मंडळीने तिला माहेरहून पैसे आणण्याकरीता तगादा लावण्यास सुरूवात केली. आपले वडिल गरीब आहेत, ते तुम्हाला पैसे कुठून आणून देणार असे सांगितले असता पतीने तिला मारहाण केली. अनेकदा दारूच्या नशेत देखील पतीने तिच्यावर मर्दुमकी गाजविली. याबाबत तिने सासू सासऱ्यांना सांगितले. मात्र त्यांनी मुलाची बाजू उचलून धरत तुझ्या बापाने काय दिले, ते भिकारी आहेत, असे बजावत तिला त्रास दिला.

दरम्यान सन २०१८ मध्ये प्रसुतीकरीता ती माहेरी आली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्याला मुलगी नव्हे, तर मुलगाच हवा, असे पतीने तिला दरडावले. तर, तुला पहिली मुलगी झाली. तुझे सिझर झाले, आपल्याला नातुच हवा, आम्ही तुला घरात घेत नाही असे म्हणून आरोपी सासरा, सासू हे सुनेला बघायला व घ्यायला सुद्धा आले नाही.

ती नांदायला तयार पण....

प्रसुतीनंतर ती भावासोबत सासरी गेली असता सासरकडील मंडळीने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तुला मुलगी झाल्याने आम्ही तुला घरात घेत नाही, असे बजावून त्यांनी तिला तिच्या नवजात मुलीसह घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे दोन महिन्यांपुर्वी तिने शहर पोलीस आयुक्तालयातील महिला सेलमध्ये तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे आरोपी पतीने तिच्यापासून घटस्फोट घेण्याकरीता न्यायालयात प्रकरण दाखल केले. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असुन सुद्धा पतीने दुसरे लग्न केल्याचे विवाहितेला समजले. त्यामुळे आपल्याला पतीसोबत नांदायची इच्छा असताना देखील आरोपींनी शारिरीक व मानसिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDomestic Violenceघरगुती हिंसाAmravatiअमरावती